Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

18 डिसेंबर पासून शेतकर्‍यांचे घारगावमध्ये उपोषण सुरू

श्रीगोंदा शहर ः शेतीमालाला तात्काळ हमीभाव मिळावा, यासाठी  तालुक्यातील घारगाव येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासंदर्भा

टाकळीच्या विनोद निकोलेची महाराष्ट्र सिक्युरिटी पोलिस फोर्समध्ये निवड
भंडारदरा व निळवंडेच्या आवर्तनातील पाण्याची नासाडी
नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या

श्रीगोंदा शहर ः शेतीमालाला तात्काळ हमीभाव मिळावा, यासाठी  तालुक्यातील घारगाव येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात तमाम शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, गेले कित्येक वर्षापासून शेतकर्‍यांनी पिकवलेल्या मालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी धडपडत आहे. परंतु रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कोणत्याच पिक मालाला बाजार भाव मिळत नाही कधी कधी तर उत्पादन खर्च पण निघत नाही. त्यामुळे शेतकर्‍यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते. असे या निवेदनात म्हटले आहे
     जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शेतकर्‍यांनी पुढे म्हटले आहे की, आज वाढती महागाई लक्षात घेता शेतीसाठी लागणार्‍या पूरक गोष्टीचे बाजार भाव दिवसेंदिवस बाद होत चालले आहेत. त्यामध्ये खते, बी- बियाणे फवारणीसाठी लागणारे औषधे, डिझेल, मजुरी यांचे भाव शंभर पटीने वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणी येत चालला आहे, शेतकर्‍याने पिकवलेले पीक जोपर्यंत शेतामध्ये उभे असते, तोपर्यंत बाजारात त्या पिकाला चांगला बाजारभाव असतो. पण तेच पीक बाजारा घेऊन गेल्यावरती त्याचा बाजार पडलेला असतो आणि तेच पीक विकून झाल्यावर त्याचा बाजार वाढलेला असतो. मागील वर्षी कपाशी तेरा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला ,आज तीच कपाशी सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली जाते .तसेच जोपर्यंत शेतकर्‍यांकडे कांदा उपलब्ध आहे, त्यावेळेस त्या कांद्याला चार ते पाच रुपयाचा भाव दिला जातो. आणि शेतकर्‍याकडील कांदा संपल्यानंतर त्याच कांद्याला चाळीस ते पन्नास रुपयांचा दर दिला जातो. अशी वेळ शेतकर्‍यावरती कायम येते. शेतकर्‍याला वेळेवर पाणी नाही, लाईट नाही, खात्रीलायक बी बियाणे उपलब्ध होत नाहीत, त्याचप्रमाणे खताचे व कीटकनाशकांचे बाजार भाव भरमसाठ वाढले आहेत. मागील काही दिवसापूर्वी गायीच्या दुधाला 35 ते 38 रुपयाचा भाव मिळत होता पण आज त्याच दुधाला 24 ते 25 रुपये याप्रमाणे दर दिला जातो. या दराचा विचार करता शेतकर्‍याला दूध धंदा परवडत नाही, पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती जनावरांच्या चार्‍याच्या वाढलेल्या किमती या, सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकरी अडचणीत येत चालला आहे. अशा भावना येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. प्रसंगी या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास गावच्या लक्ष्मी माता मंदिरात आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे या जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रामुख्याने शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाला दर वाढवून मिळावा, कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कर्जमाफी पासून वंचित शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने वीज मिळावी, उसावरील इथेनॉल बंदी उठवावी आदी प्रमुख मागणीसाठी घारगावच्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर संगीता खामकर, बापूराव निंभोरे, महेश पानसरे, शरद जगताप, राजेंद्र थिटे, शरद पाटोळे भूषण बडवे आदीसह 25 शेतकर्‍यांच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS