काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्याला बक्षीस : सागर केदार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्याला बक्षीस : सागर केदार

कर्जत प्रतिनिधीरेहेकुरी अभयारण्य कार्यक्षेत्रातील कुळधरणनजीकच्या मोतिरा जंगलात आज काळविटाची शिकार झाल्याचे उघड झाले. या प्रकाराची वनपरिक्षेत्र अधिकार

गांधी जयंतीनिमित्त तरडगाव ग्रामस्थांनी घेतली ग्रामस्वच्छतेची शपथ
आणखी एक बडा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात
कर्जतचे भूमिपुत्र हवालदार हिंमत जाधव यांचे अकाली निधन

कर्जत प्रतिनिधी
रेहेकुरी अभयारण्य कार्यक्षेत्रातील कुळधरणनजीकच्या मोतिरा जंगलात आज काळविटाची शिकार झाल्याचे उघड झाले. या प्रकाराची वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी गंभीर दखल घेतली आहे. बिटच्या वनरक्षकांना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गट नंबर ९७६ मध्ये एक नर काळविटाची शिकार झालेली आढळून आली.


केदार यांनी सूचित केल्यानुसार राशीन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन करून अहवाल दिला. या प्रकारासंदर्भात बोलताना सागर केदार म्हणाले, मांसाचे काही नमुने पुढील तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.

घटनेतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल व त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. स्थानिक पातळीवर गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कसल्याही गुन्ह्याबद्दल हलगर्जीपणा केला जाणार नाही.

COMMENTS