जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांना निरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांना निरोप

अहमदनगर/प्रतिनिधी ः नुकतीच अहमदनगर जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांची बदली झाली असून त्यांचा अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनच्यावतीने तसेच अहमदनगर नोट

शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी ः राजेश परजणे
राजेंद्र गांधींनी दिले सुवेंद्र गांधींना आव्हान… नगर अर्बन बँकेची रणधुमाळी झाली सुरू
प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये पेरू दाब कलम कार्यशाळा संपन्न

अहमदनगर/प्रतिनिधी ः नुकतीच अहमदनगर जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांची बदली झाली असून त्यांचा अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनच्यावतीने तसेच अहमदनगर नोटरीज असोसिएशनच्यावतीने अहमदनगर क्लब येथे सत्कार व निरोप समारंभ करण्यात आला.
या समारंभात जिल्हा व प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांनी सांगितले की, वकील संघटना संघटना यांच्या उत्कृष्ट सहकार्यानेच न्यायदानाचे काम न्यायाधीश बजावतात व त्यामुळेच पक्षकारांना योग्य न्याय मिळतो. यावेळी सेंट्रल बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड किशोर देशपांडे, अ‍ॅड. अशोक कोठारी, अ‍ॅड. विश्‍वासराव आठरे पाटील, अ‍ॅड सुभाष काकडे, अ‍ॅड. फारुक शेख, अ‍ॅड. विजय भगत, अ‍ॅड. सुजाता कोठारी, अ‍ॅड. नीलमणी गांधी, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे आदी विधिज्ञ उपस्थित होते. अहमदनगर नोटरीज असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर भागवत व सचिव अ‍ॅड. विक्रम वाडेकर यांनीही न्यायाधीशांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात बदली झालेल्या न्यायाधीशांपैकी पी. के, खराते, पी. व्ही. चतुर, जी. के. नंदनवर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. वेद देशपांडे व अ‍ॅड. योगेश काळे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अ‍ॅड. संदीप डापसे यांनी केले.

COMMENTS