Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एटीएम कार्ड बदलून लुट करणारी टोळी जेरबंद

धुळे प्रतिनिधी- एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केले

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम वर्षभराच्या बंदीनंतर भारतात पुन्हा होणार लॉन्च
सार्वजनिक स्वच्छता हा दिनचर्येचा भाग झाला पाहिजे : विमल पुंडे
राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार ः मुख्यमंत्री शिंदे

धुळे प्रतिनिधी- एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून विविध बँकांचे 94 एटीएम कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या चारही आरोपीं सराईत असून राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन या संदर्भात माहिती दिली. यावेळी यातील एका आरोपीने लोकांची ते कशी फसवणुक करायचे याची पद्धत देखील यावेळी सांगितली.मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासींगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची खात्रीशिर माहिती काल रोजी उशिरा शिरपूर ,, मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद गावाकडे जावून संशयीत इसम व वाहनाचा शोध सुरु केला. साखर कारखान्याजवळ MH 02 BZ 3439 गाडी व त्यात चार जण मिळून आले. त्यांना त्यांचे नांव विचारून त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांची नावे सांगीतले यातील सर्व आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यावरुन त्यांची व वाहनाची तपासणी केली असता गाडीत 94 एटीएम ATM कार्ड मिळून आले. ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकाने केली.

COMMENTS