Homeताज्या बातम्याबीड

धुनकवाड येथे सरपंच भागवत गव्हाणे यांच्या पुढाकारातून पिण्याच्या पाण्याची सोयबंद हातपंपांना मोटार बसवून टाक्यांची व्यवस्था;ग्रामस्थांना दिलासा

धुनकवाड नं. 1 व 2 येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करण्यात

पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा
तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बरखास्त
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळीतील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांची तपासणी पूर्ण



धुनकवाड नं. 1 व 2 येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करण्यात आली आहे. गावातील बंद पडलेल्या हातपंपांमध्ये मोटार बसवून तसेच पाणीसाठ्यासाठी टाक्यांची व्यवस्था करून ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
धुनकवाडचे कार्यतत्पर सरपंच भागवत गव्हाणे यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. गावातील अनेक हातपंप तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत होते. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने बंद हातपंपांची दुरुस्ती करून त्यामध्ये मोटार बसविण्याचा निर्णय घेतला. यासोबतच पाण्याचा साठा उपलब्ध राहावा यासाठी पाण्याच्या टाक्यांचीही व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांना नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होत आहे. कमी वेळेत प्रभावी नियोजन करून ही सुविधा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या पाणीपुरवठा सुविधेचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांनी सरपंच भागवत गव्हाणे यांच्या कार्याचे कौतुक करत ग्रामपंचायतीने गावकर्‍यांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत असताना धुनकवाड ग्रामपंचायतीने केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.

COMMENTS