Homeताज्या बातम्या

किशोरी इंग्लिश स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशी बाल दिंडी सोहळा; टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमयविठ्ठल-रुक्मिणीसह संतांच्या रुपातील बाल गोपाळांनी वेधले नागरिकांचे लक्ष; सीए गिरीश गिल्डा यांच्या हस्ते पालखी पूजन

बीड : आषाढी एकादशीच्या औचित्याने वारी परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची पेरणी करण्यासाठी

देवळाली प्रवरात रंगला चिमुकल्यांच्या रिंगण सोहळापी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची दिंडी
आषाढी वारीसाठी 5,500 विशेष बसगाड्यांची व्यवस्थामंत्री सरनाईक यांची माहिती ; विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरी सज्ज
वीस हजार वारकरी अन विठू नामाचा जयघोष..!संत निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल


बीड : आषाढी एकादशीच्या औचित्याने वारी परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची पेरणी करण्यासाठी किशोरी इंग्लिश स्कूलच्या वतीने शुक्रवार 24 जुलै रोजी भव्य बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. भक्ती, एकता आणि शिस्तीचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला शाळेचे संचालक सीए गिरीश गिल्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी यथोचित विधीवत पालखीचे पूजन करून श्रीफळ वाढवून दिंडीला मार्गस्थ केले. विद्यार्थांना मार्गदर्शन करत विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहभागाचे कौतुक करत महाराष्ट्राची ही गौरवशाली आध्यात्मिक परंपरा जपण्याचे आवाहन केले. प्ले ग्रुप ते 4 थी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्याध्यापकांसह संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली.
संतांच्या रुपातील बाल गोपाळांनी वेधले लक्ष
या बाल दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे लहान मुलांनी साकारलेली भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी आणि वारकरी संतांची रुपे होती. त्यामध्ये इयत्ता 2 री मधील अनय आदित्य सारडा याने भगवान विठ्ठल तर मन्वा मन्मथ खडके हिने माता रुक्मिणीची सुरेख भूमिका साकारली.दक्षराज दीपक भागवत (संत एकनाथ), राघव गिरीश गिल्डा (संत नामदेव), सावी संतोष लहाने (संत मुक्ताबाई), मनुश्री संतोष लहाने (संत जनाबाई),आयुष लखन लोंढे (संत सोपानदेव), राजवीर वैभव मानकर (संत तुकाराम), आरोही अमोल खरगे (संत मीराबाई) आणि शेखर बिखाड व वेदांग विशाल काळे (संत ज्ञानेश्वर) यांनी संतांच्या वेशभूषेत दिंडीला आध्यात्मिक उंची मिळवून दिली.
विठ्ठल विठ्ठल’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी डॉक्टर्स कॉलनी- बियाणी कोचिंग क्लासेस चौक- विप्रनगर- महेश चौक आणि माँ वैष्णो पॅलेस मार्गे पुन्हा शाळेत परतली. डोक्यावर तुळशी वृंदावन,हातात टाळ, वीणा आणि भगवे झेंडे घेतलेले लहानगे  विठ्ठल विठ्ठल चा गजर करत पुढे सरकत होते. वाटेत नागरिकांनी बालवारकर्‍यांचे आणि शाळेच्या शिस्तीचे भरभरून कौतुक केले. इयत्ता 3 री आणि 4 थी च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल गाण्यावर सादर केलेल्या ऊर्जस्वी नृत्याला उपस्थितांनी प्रचंड दाद दिली.

COMMENTS