Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोवा बनावटीच्या दारूचा ट्रक पकडण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश

सातारा / प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क, कोल्

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न : ना. उदय सामंत
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आजचा मुक्काम कोठे?
‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ ला वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सातारा / प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे उपायुक्त डॉ. एच. बी. तडवी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवार, दि. 26 रोजी मौजे- खोडद, ता. जि. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर हॉटेल राजपुरोहीत समोर गोव्यावरुन राजस्थानला जाणारी बेकायदा गोवा बनावटीची विदेशी दारुचा ट्रक असा 53,29,275/- मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाने गोवा बनावटीच्या दारूची अवैध रित्या वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत 180 मि.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 36,000 बाटल्या (750 बॉक्स), एक सहाचाकी आयशर ट्रक दोन मोबाईल, दारुचे बॉक्स लपवण्यासाठी वापरलेल्या काजूच्या टरपलांच्या 47 गोणीसह असा एकूण 53 लाख29 हजार 275 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. याप्रकरणी मुकेश मोहनलाल सिसोदिया (वय 39, रा. खजुरीया, ता. हातोड, जि. इंदोर, मध्यप्रदेश), जितेंद्र भरतसिंग राठोड (वय 36, रा. मेथवाडा, ता. डेपालपूर, जि. इंदोर, मध्यप्रदेश) या दोघांना अटक करुन त्यांच्या विरुदध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65(र)(श),81,83,90,103 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश न्यायालयाने दिले.
या कारवाईमध्ये प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर, निरीक्षक संजय साळवी, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, रोहीत माने, शरद नरळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव, जवान सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जिवन शिर्के, किरण जंगम, भिमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी भाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर करत आहेत.
सातारा जिल्हयामध्ये बेकायदा गोवा बनावट, बनावट दारुची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या कार्यालयास तात्काळ देण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक वैभव वैद्य यांनी केले आहे.

COMMENTS