Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक सिध्दांतासाठी आग्रही व्हा!

नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी …
मा.आमदार नितीन पवार यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद शाळा मनखेड येथे दोन वर्ग खोल्या मंजूर
लालबागमध्ये तरुणाची हत्या, गुन्हा दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे, काही सामाजिक पातळीवर चर्चेत अधिक न येणाऱ्या विषयांवर आज मांडणी करणे काळाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१५ पासून आपल्या शिक्षणाच्या निमित्ताने प्रबंधांना लिहीण्याची सुरुवात केली. १९१५ या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या वित्तीय पुरवठा संदर्भात प्रबंध लिहिला. हा प्रबंध एम‌ए च्या डिग्रीसाठी त्यांनी सादर केला होता. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्ज पुरवठा धोरणावर आणखी एक प्रबंध लिहिला. मात्र, पीएचडी च्या पदवीसाठी त्यांनी सादर केलेला “प्राॅब्लेम ऑफ द रूपी : इट्स ओरिजिन ऍण्ड इट्स सोलूशन” ब्रिटिश सरकारच्या एकूणच धोरणावर आणि सिध्दांतावर टिकेची झोड उठवणारा आणि तितकाच मजबूत पर्यायी सिध्दांत मांडणारा प्रबंध होता. ब्रिटिश सरकारने भारताच्या चलन धोरणातून कशी लूट चालवली आहे, हे त्यांनी सप्रमाण परंतु, तितक्याच कठोर शब्दांत मांडला. साहजिकच ब्रिटिश अर्थव्यवस्था डोक्र्यावर उचलणारे अर्थतज्ज्ञ असणारे परिक्षक यांनी त्या प्रबंधाला मान्यता देण्यास नकार दिला. परिक्षकांच्या या निर्णयावेळी डॉ. आंबेडकर जर्मनीत बाॅन येथे अर्थव्यवस्थेच्या आणखी एका डिग्रीसाठी होते. त्यांचे गुरू किंवा मार्गदर्शक प्रा. केन यांनी परिक्षक तुमच्या प्रबंधात काही बदल करण्यास सुचवत असल्याचे सांगताहेत, तुम्ही ताबडतोब लंडन ला या. त्यानंतर बाॅनहून तातडीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये येऊन त्यांनी प्रंबंध छाननी समितीला सांगितले की, माझ्या प्रबंधात चुकीचे किंवा खोटे काय आहे, ते दाखवून द्या, त्यात बदल करतो. डॉ. आंबेडकर यांच्या या प्रश्नावर समिती सदस्य उत्तर देऊ शकले नाहीत. हाच प्रबंध ग्रंथ रूपात १९२३ ला प्रसिद्ध झाला. या ग्रंथात डॉ. आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारने रूपयाचे मूल्य अस्थिर करण्याचे धोरण आखून भारताची म्हणजे पर्यायाने भारतीयांची आर्थिक लूट चालवली ती थांबवावी, असे थेट आवाहन केले होते.
मुघलांच्या काळात भारतीय चलन हे गोल्ड स्टॅंडर्ड होते. परंतु, त्यानंतर येणाऱ्या राज्यकर्त्यांनी गोल्ड आणि सिल्वर स्टॅंडर्ड हटवून रूपयाचे अवमूल्यन करण्याची परंपरा निर्माण केली. ज्यामुळे रूपयाचे मूल्य अस्थिर होते आणि महागाई वाढत जाते.या संदर्भात एक लहान उदाहरण घेऊया. गोल्ड आणि सिल्वर स्टॅंडर्ड चलनात १७५ ग्रॅम सोने आणि चांदीची नाणी चलनात असत. यामुळे त्या चलनात त्यांच्या किंमती एवढे सोने- चांदी असल्यामुळे, त्या चलनाची किंमत स्थिर राहून वस्तुंचे भावही स्थिर राहतात. यामुळे सामान्य माणसाला महागाई ला सामोरे जावे लागत नाही. परंतु, ब्रिटीशांनी भारतात गोल्ड, सिल्वर स्टॅंडर्ड ऐवजी गोल्ड, सिल्वर एक्सचेंज चलन स्विकारल्याने रूपयात त्याच्या किंमती एवढे सोने, चांदी असण्याची शक्यताच नसल्याने, रूपया अस्थिर होवून महागाई वाढू लागते. अशा प्रकारची चलन व्यवस्था ही सर्वसामान्यांची लूट करणारी म्हणजे महागाई आणि बेरोजगारी ला निमंत्रण देणारी ठरते.
आज प्राॅब्लेम ऑफ रूपी या ग्रंथाला शंभर वर्षे होवून गेले; तरीही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सिध्दांताची उपयुक्तता तितकीच किंबहुना त्यापेक्षा आज अधिक आहे. आज देशात बेरोजगारी आणि महागाई कमालीची वाढली आहे. आपल्या चलनाचा विनिमय दर डाॅलर च्या तुलनेने ठरतो. परंतु, नोटा छापण्याचा अधिकार जो सरकारकडे असतो, त्यास डॉ. आंबेडकर यांचा विरोध होता. वर्तमान सरकाने मोनिटायझेन च्या नंतर हेच केले. चलन फुगवटा करून रूपयाचे मूल्य सतत अस्थिर करून देशातील गरीबांच्या हातातील पैसा महागाईच्या रूपाने खेचून घेताहेत. त्यातून देशातील काही भांडवलदारांचा फायदा होऊन, जनता लूटली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या आर्थिक सिध्दांताना अंमलात आणण्यासाठी आपल्याला आता आग्रही व्हावे लागेल, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल!

COMMENTS