Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘आनंदाचा शिधा’ चा 17 हजार कुटुंबीयांना मिळणार लाभ

शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी - राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमत्ति पात्र शिधापत्रिकाधा

आरक्षणासाठी परीक्षेत पेपरवर लिहिलं ‘एक मराठा कोटी मराठा
शिक्षकांच्या मागणीसाठी संतप्त पालक व शालेय व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलुप
बिरवली येथे सर्व रोग निदान शिबीरास प्रतिसाद

शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी – राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमत्ति पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा’ वाटपाला सुरुवात झाली असून याचा अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, केशरी शिधापत्रिकाधारक शेतक-यांना लाभ मिळणार आहे. तालुक्यात 17 हजार 658 कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे.
रेशन दुकानावर दिवाळीप्रमाणे फक्त शंभर रूपयात हा आनंदाचा शिधा लाभार्थी शिधा पत्रिकाधारकांना मिळणार असून ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने देखील हा शिधा दिला जाणार असून तालुक्यातील 17 हजार 658 कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे. गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंतच्या कालावधीत सर्व पात्र कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार आहे. गुढीपाडवा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “ आनंदाचा शिधा ‘ कीटच्या माध्यमातून गरिबांना 100 रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चनाडाळ व पामतेल वाटप केले जात आहे. उजेड येथे राहुल भानुदास धुमाळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी मन्सूर शेख, पांडू कदम, खयुम पटेल, जब्बार शेख,बब्रुवान मरडे,शादुल शेख, तुकाराम चिरके आदी लाभार्थी उपस्थित होते.

COMMENTS