पी-वन व पी-टू आणि सशुल्क वाहनतळ कागदावरच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पी-वन व पी-टू आणि सशुल्क वाहनतळ कागदावरच

फेरीवाला मुक्त चौकांकडे मनपा-पोलिस व जिल्हाप्रशासनाकडून दुर्लक्ष

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या बाजारपेठेत रस्त्यावरछोटे-मोठे साहित्य विकणारे हॉकर्स व दुकानांतून कपड्यांसहअनेकविध साहित्य विकणारे दुकानदार यांच्यातील सं

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय | Filmi Masala | LokNews24
कोळपेवाडीत साकारणार अद्यावत कॉम्पलेक्स व बसस्थानक
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या बाजारपेठेत रस्त्यावरछोटे-मोठे साहित्य विकणारे हॉकर्स व दुकानांतून कपड्यांसहअनेकविध साहित्य विकणारे दुकानदार यांच्यातील संघर्ष सध्या टोकाला जाण्याच्यास्थितीत आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित केलेला पी-वन वपी-टू पार्किंग आराखडा, चार रस्ते व नऊ चौक फेरीवाला मुक्त आणि शहरातविविध 25 ठिकाणी प्रस्तावित केलेले सशुल्क वाहनतळ प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे.महापालिका, पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नगर शहरातवारंवार वाहतूक ठप्प होण्याची समस्या उदभवते तसेच विक्रेत्यांसहदुकानदारांच्याही अतिक्रमणाने रस्त्याने पायी जाणे मुश्किल होत आहे.

नगरला अडीच-तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून कामपाहणारे राहुल द्विवेदी यांनी नगर शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी ववाहतुकीला शिस्त लागावी म्हणून नऊ चौक फेरीवाले मुक्त, पाच रस्त्यांवर पी-वन आणिपी-टू तसेच शहरात विविध 25 ठिकाणी सशुल्क वाहनतळ प्रस्तावित केले होते.यासाठी नगरकरांकडून हरकती व सूचनाही मागवल्या होत्या. त्याचे नियोजनमनपाकडे दिले होते. मात्र, सुरुवातीला व्यापार्‍यांनी याला विरोध केला. त्यानंतरनागरिकांनीही यावर फारसे मत व्यक्त केले नाही. नेहमीप्रमाणे राजकीय मंडळींचाविरोध होताच. परिणामी, हा प्रस्ताव बारगळला. मात्र, त्यामुळे नगर शहरातील वाहतूककोंडी, अतिक्रमणे समस्या कायम राहिली. नगरमध्ये सध्या व्यापारी व हॉकर्सयांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मनपा, पोलिस व जिल्हा प्रशासनानेकठोर भूमिका घेऊन फेरीवाले मुक्त चौक, पी-वन आणि पी-टू तसेच सशुल्कवाहनतळाचा बासनात गुंडाळून ठेवलेला प्रस्ताव पुन्हा वर काढणे व त्यावरगांभीर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे.

पाच रस्त्यावर वाहतूक नियोजन

वाहतूक कोंडी वारंवार होत असलेल्या शहर व उपनगरांतीलपाच रस्त्यांवर पी-1 व पी-2 वाहन पार्किंग सुविधा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. यातसावेडीतील भिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हटको चौकापर्यंत,सावेडीतील पाईपलाईन रोड व गुलमोहोर रोडला जोडणारा एकवीराचौक ते पारिजात चौक रस्ता, स्टेशन रस्त्यावरील कोठी रोड ते यशपॅलेस हॉटेलपर्यंतचा रस्ता, दिल्लीगेटजवळील नीलक्रांती चौक ते चौपाटीकारंजा आणि चितळे रस्त्यावरील नेता सुभाष चौक ते नवीपेठ-शहर सहकारीबँकेपर्यंतच्या रस्त्यावर सम-विषम तारखांना रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनीआलटूनपालटून पार्किंग करण्याचे यात प्रस्तावित होते. तसेच नगर शहरात विविधकामासाठी वास खरेदीसाठी येणारांची दुचाकी व चारचाकी हलकी वाहनेपार्किंग करण्यासाठी 25 ठिकाणी सशुल्क पार्किंग सुविधा करण्याचेही प्रस्तावितहोते. मात्र, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या बदल्या झाल्या व तिकडे मनपाचेमहापौर व आयुक्तही बदलले गेले. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचाप्रस्तावच फायलींमध्ये अडकून गेला व अजूनही धूळखात पडून आहे.

पार्किंग व फेरीवाले निषिद्धचार रस्ते व नऊ चौक

पार्किंग व फेरीवाले निषिद्ध चार रस्ते व नऊ चौक या प्रस्तावातहोते. कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा रंगभवनपर्यंतचा रस्ता, जुन्याबाजारातील कोर्ट गल्ली ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, सावेडीतीलझोपडी कॅन्टीन ते मिस्किन मळा गंगा उद्यानापर्यंतचा रस्ता व स्टेशनरस्त्यावरील मार्केट यार्ड चौक ते सक्कर चौक रस्ता हे चार रस्ते पार्किंग वफेरीवाले निषिद्ध रस्ते प्रस्तावीत होते. तसेच सावेडीतील भिस्तबाग चौक(पाईपलाईन रोड) व प्रोफेसर कॉलनी चौक (कुष्ठधाम रोड),सिद्धीबागेजवळील दिल्लीगेट चौक, चितळे रोडवरील चौपाटी कारंजा चौकआणि याच रस्त्यावरील नेता सुभाष चौक तसेच कापड बाजारातील तेलीखुंट चौकव भिंगारवाला चौक, जुन्या बाजारातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकआणि सावेडीच्या कुष्ठधाम रस्त्यावरील तहसील कार्यालय परिसर असे नऊ चौकपार्किंग व फेरीवाले निषिद्ध चौक प्रस्तावित करण्यात आले होते. या प्रस्तावावर आतानव्याने पुन्हा विचार करण्याची गरज आहे.

COMMENTS