Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकीच्या इंजिनचा वापर करत बनवली शेतीपूरक चारचाकी गाडी

एक वर्षानंतर चारचाकी गाडी बनविण्यात यशस्वीइस्लामपूर / प्रतिनिधी : येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूर

पावसाअभावी शेतकरी हतबल
लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?
अवकाळी पावसाने माण तालुक्यात फळबागांचे करोडोचे नुकसान

एक वर्षानंतर चारचाकी गाडी बनविण्यात यशस्वी
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकर्‍यांना वरदान आहेत. मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील यांच्या चेहर्‍यावर हास्य उमटले.
इस्लामपूर-पेठ रस्त्यावर विष्णुनगर येथे कुमार पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गेली वीस वर्षेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत. हे असताना शेतकर्‍यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का? याचा विचार त्यांनी केला. एक वर्षांपूर्वी त्यांना चारचाकी गाडीची कल्पना सुचली. चारचाकी गाडीसाठी लोखंडी साहित्य वापरताना दुचाकीचे इंजिन वापरण्याचे ठरले. 100 सीसी इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा तयार झालेल्या चारचाकी गाडीचा सांगाडा काही कारणास्तव मोडण्यात आला. घरापेक्षा फॅब्रिकेशनच्या दुकानात जास्त वेळ देत असल्याने कुटुंबियांमध्ये नाराजी होती. परंतू चारचाकी गाडी बनवण्याचा चंग कुमार पाटील यांनी मनी पक्का बांधला होता. त्यामुळे त्याने नवनिर्मितीचा ध्यास घेत पुन्हा ही गाडी तयार केली. चारचाकी गाडी तयार करीत असताना स्टेरिंग ऐवजी हॅण्डलचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चारचाकी कारप्रमाणे गिअर टाकून गाडी पाठीमागे सहज कशी घेता येईल का? यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले आहे. इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गियरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला आहे. त्यानंतर तयार गाडीला शेतीपुरक अवजारे कशी जोडता येतील? यासाठी मित्रांशी चर्चा करून तशी अवजारे ही बनवण्यात आली. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. खडतर रस्त्यावर कमीत-कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते. त्यामुळे अरूंद जागेत गाडीचा वापर शेतीला कसा करता येईल? असा विचार केला आहे. शहरातून शेतातील गोठ्यामध्ये पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीची ने-आण करणे यासाठी सीटच्या मागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे. रविवार, दि. 16 जानेवारी रोजी कुमार पाटील यांनी विष्णूनगरमध्ये एका शेतकर्‍याच्या शेतीमध्ये गाडीची चाचणी घेतली. 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 एकर क्षेत्रातील कोळपनीचे काम ही चारचाकी गाडी सहजपणे करत आहे. अल्प वेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करत असल्याने शेतकर्‍यांना ती नक्कीच वरदान ठरणार आहे.

माफक दरात चारचाकी दारात
कुमार पाटील यांनी बनवलेल्या चारचाकी गाडीसाठी दुचाकीचे टायर, हॅण्डल, दोन चाकांसाठी दोन ब्रेक, बसण्यास सीटची व्यवस्था आहे. लोखंडी अ‍ॅगल व पाईपच्या माध्यमातून चारचाकी गाडी साकारली आहे. यासाठी 40 ते 50 हजारांचा माफक खर्च झाला आहे. या गाडीचा देखभाल व दुरुस्ती खर्च अत्यल्प आहे. त्यामुळे माफक दरात चारचाकी दारात आणण्याचे स्वप्न शेतकर्‍यांचे पुर्ण होणार आहे.

खेर स्वप्न सत्यात उतरले
कुमार पाटील हे अल्पशिक्षित असले तरी लहानपणापासून कल्पक व कष्टाळू आहेत. गेल्या 20 वर्षांपासून फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. त्याचबरोबर जोडधंदा म्हणून सकाळच्या वेळी वर्तमानपत्रांच्या वितरणाचे काम करतात. दिवसभर कष्ट करून मनातील स्वप्न सत्यात उतरल्यानंतर कुमार पाटील यांच्या चेहर्‍यावर समाधान ओसांडून वाहत होते.

COMMENTS