Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटणमध्ये उसाच्या रसासह बायोसिरप आधारीत इथेनॉल प्रकल्प होणार

फलटण / प्रतिनिधी : उसाचा रस आणि बायोसिरपवर आधारित आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारणार असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अ‍ॅण्ड क

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ला
15 दिवसांत कारखाना सुरु करा : मदन भोसले यांचे नूतन संचालकांना आवाहन

फलटण / प्रतिनिधी : उसाचा रस आणि बायोसिरपवर आधारित आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारणार असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अ‍ॅण्ड क्यूएल लिमिटेडने केली आहे. प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रतिदिन 500 व दुसर्‍या टप्प्यात 1100 किलो लिटरपर्यंत वाढवली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
आशिया खंडात सध्या सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे. तेथील गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड कंपनीकडून प्रति दिन 600 किलो लिटर इथेनॉल उत्पादन केले जात आहे. फलटण येथील प्रकल्पाची क्षमता त्यापेक्षा अधिक असणार आहे. स्वराजने प्राईज इंडिया लिमिटेड सोबत तंत्रज्ञान भागीदारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2010 मध्ये स्थापन झालेल्या स्वराला भारतातील सर्वात प्रगतशील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनापैकी एक म्हणून ओळखले जाते. स्वराजने आधीच प्रतिदिन 60 किलो लिटर क्षमतेचा मोलॅसिस आधारित हा प्रकल्प उभारला आहे. राजच्या तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प देशाच्या इतर प्रकल्पामध्ये सर्वात कमी पाण्याचा वापर करणारा म्हणून ओळखला जातो.
2023 पर्यंत सुरु होणार प्रकल्प
स्वराज आणि प्राज यांचा विस्तारित प्रकल्प 2023 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. प्राजकडे प्रकल्प आराखडा, अभियांत्रिकी, पुरवठा आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जबाबदारी असेल. उसाचा रस आणि बोयोसिरप या इथेनॉलनिर्मितीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पांमध्ये केला जाईल. प्राजच्या उसाच्या रसावर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर बोयोसिरपमध्ये करण्याच्या अभिनव तंत्रज्ञानामुळे स्वराजला वर्षभर इथेनॉल उत्पादन सुरू ठेवण्यास मदत होईल. प्राजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, आम्ही स्वराजला एक तंत्रज्ञान जाणकार ग्राहक म्हणून ओळखतो. प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी ते नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास तयार असतात. हा प्रकल्प भारत सरकारच्या मिश्रणाच्या धोरणाची पूर्तता करण्याच्या दिशेने पडलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. केंद्र सरकारने आखलेल्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाशी या प्रकल्पाच्या आधारे जोडले जात असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही प्राजच्या कौशल्य व बांधिलकीची प्रशंसा करतो. हा प्रकल्प सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी समुदायाला रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल.

COMMENTS