Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर महापौर निवडणुकीत काँग्रेस-वंचितमध्ये तणाव

भाजपकडून वंचितला पाठिंबा देण्याचे संकेत लातूर : लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या राजकारणात चांगलीच हालचाल

दोन दिवसात काँग्रेसच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करणार… चंद्रकांत पाटलांचा इशारा (Video)
मुंबईत काँगे्रसचा स्वबळाचा निर्णय ठरणार आत्मघातकी
काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करणार

भाजपकडून वंचितला पाठिंबा देण्याचे संकेत
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या राजकारणात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील आघाडीमध्ये मतभेद उफाळून आल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने महापालिकेतील राजकीय गणिते नव्याने जुळवली जात आहेत.
महापौर पदासाठी काँग्रेसने जयश्री सोनकांबळे यांना उमेदवारी दिली असून, वंचित बहुजन आघाडीकडून निकिता रोहित सोमवंशी यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या स्नेहल उटगे तर वंचितकडून सचिन गायकवाड रिंगणात आहेत. यामुळे आतापर्यंतची आघाडी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात समोरासमोर आली आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी या घडामोडींवर भाष्य करताना स्पष्ट भूमिका मांडली आहे. वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार कायम ठेवले, तर भाजप त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने निवडणुकीनंतर मित्रपक्षाला डावलल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या राजकीय समीकरणात आणखी रंग भरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने वंचितच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 70 सदस्यसंख्या असलेल्या लातूर महानगरपालिकेत काँग्रेस-वंचित आघाडीकडे एकत्रितपणे 43 नगरसेवकांचे बहुमत आहे. मात्र, युतीतील फूट स्पष्ट झाल्याने भाजपचे 22 नगरसेवक या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापौर व उपमहापौर पदाची ही निवडणूक येत्या 9 फेब्रुवारी रोजी होणार असून, निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS