लॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळी!अनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळी!अनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी

गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवांच्या समस्या जवळून पाहतोय.

जिल्हाधिकारी देणार शासकीय रुग्णालयांना नियमित भेटी
पुण्यात डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू
इस्रोच्या गगनयानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

बुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे :
गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवांच्या समस्या जवळून पाहतोय. दिवसभर रस्त्याच्या बाजूला बसून जनतेच्या फाटक्या चप्पला शिवल्यावरच आम्हाला चार पैसे मिळतात. त्यावरच आमच्या घरातील चूल पेटते. दिवसाला शहरी भागात 200 ते 300 रुपये उत्पन्न मिळते. त्यात घर खर्च, बॅंकेचे हप्ते, घराचे भाडे दिले जाते. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे एक-दिड वर्षापासून आमचा व्यवसाय बंद आहे.

 : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे सध्या सर्व उद्योगधंदे बंद असल्याने हातावरचे पोट असणाऱ्या गटई कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.बुलडाणा जिल्ह्यात सुमारे 2000 हजार तर शहरात 500 गटई कामगार आहेत.  ते रोज रस्त्यावर बसून चपला शिवून देतात. त्या सर्व कामगारांचे सध्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. या कामगाराने सांगितले की, दिवसभर रस्त्याच्या बाजूला बसून चप्पल शिवल्यावरच आम्हाला चार पैसे मिळतात. त्यावरच आमच्या घरातील चूल पेटते. दिवसाला 200 ते 300 रुपये  मिळतात. त्यात घर खर्च, बॅंकेचे हप्ते, घराचे भाडे दिले जाते. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे एक ते दिड वर्षांपासून व्यवसाय बंद आहे. त्यामुळे सध्या आम्हा कामगारांवर मोठे संकट ओढावले आहे,धाड ता.जि.बुलडाणा येथील  एका अपंग गटई कामगाराने तर कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांना मागीतली होती ही बाब आम्ही समाजातील लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनसाठी लाजीरवाणी आहे, तरीही आमचे अनेक लोकप्रतिनिधी विधानसभेत,लोकसभेत आहेत ते त्यांच्या-त्यांच्या  पक्षांच्या दावणीला बांधले गेलेत,काही तर आपली राजकीय पोळी भाजुन घेत आहेत तर आर्धे त्यांच्या गाडी,बंगला,बायको,पोरा बाळांमध्ये मश्गुल आहेत,या मुळे आमचे गटई कामगार बांधव रोज आत्महत्या करत आहेत.
रेशन दुकानात गेल्यावर आमच्याकडे केशरी रेशन कार्ड असल्याने आज या, उद्या या असे उत्तर मिळते. नाहीतर नुसते तांदूळ दिले जात असल्याची खंत अनेक कामगारांनी व्यक्‍त केली. दोन वर्षांपासून कसेतरी दिवस काढावा लागत आहे. आमचे ठिक आहे हो; परंतु आमच्या मुलांचे काय? त्यांच्या या बागडण्याच्या वयात नुसते रेशन च्या भातावर कसे पोट भरणार. त्यांना कुठून भाकरीची कोर आणायची हा प्रश्‍न आम्हाला दिवसभर सतावतो आहे. त्यामुळे आमच्या रोजंदारीच्या काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी आमची मागणी आहे. गटई कामगारांची खंत  शासनाने गटई कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला कर्ज मिळावे यासाठी  संत रोहिदास चर्मकार उद्योग महामंडळाची स्थापना केली. मात्र, हे महामंडळ नुसते नावालाच आहे. या महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंत गटई कामगारांनी व्यक्त केली. उत्पन्न मिळते तेवढ्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो  लॉकडाउनमुळे सध्या गटई कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. त्यांचे हातावरचे पोट असल्याने जेवढे उत्पन्न मिळते तेवढ्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष घालावे. त्यांच्या समस्या सोडवाव्यात, त्यांना लॉकडाउनच्या काळात उत्पन्न नसल्याने नुकसानभरपाई द्यावी. या साठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर,प्रदेशाध्यक्ष डि.टी.शिपणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलने  करण्यात येऊन गटई कामगार बांधवांच्या समस्या वेळो वेळी मांडल्या,अनेकांना अन्न धान्य किराणामाल देऊन सामाजिक भान जपले,कोविड काळात अनेक समाज बांधव कोरोनाबाधीत झाले त्यांना सरकारी दवाखान्यात बेड उपलब्ध होत नव्हते त्यांना बेड उपलब्ध करून देण्यात आले,विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदे सारखे कार्य आपल्या लोकप्रतिनिधींकडून,समाजसेवक मंडळींकडून व्हायला हवेत.अन्यथा येणाऱ्या काळात समाज तुम्हाला माफ करणार नाही.

COMMENTS