Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत राष्ट्रवादीची जोरदार पोस्टरबाजी

शरद पवार बाहुबली तर प्रफुल्ल पटेल कटप्पा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील बहुतांश आमदारांसह बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्या

या कारागृहातील कैद्याचा झाला मृत्यू, घरच्यांनी लावला हत्येचा आरोप | LOKNews24
अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भेगा थातुरमातुर बुजवणे नव्हे तर ब्लॉक कट करुन दुरुस्ती सुरू-डॉ.गणेश ढवळे
हृदय विकाराच्या धक्क्याने 23 वर्षाच्या पैलवानाचा कोल्हापूरात मृत्यू

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील बहुतांश आमदारांसह बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने लावलेल्या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच बंडखोर नेत्यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये ’सारा देश देख रहा है, अपनो मे छुपे गद्दारो को, माफ नही करेगी जनता, ऐसे फर्जी मक्कारो को’, असं खोचक कॅप्शन देत बंडखोर नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी देशभरातून अनेक कार्यकर्ते आणि नेते दिल्लीत पक्षाच्या कार्यालयात दाखल होत आहे. ऑफिसबाहेरच प्रफुल्ल पटेल यांना कटप्पा तर शरद पवार यांना बाहुबली दाखवणारं पोस्टर झळकावण्यात आलं आहे. त्यात प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या पाठीत तलवार खुपसताना पोस्टरमधून दिसून येत आहे. त्यामुळं आता हे पोस्टर दिल्लीत जरी लावण्यात आलेलं असलं तरी त्यावर महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांच्या फोटोला काळं फासलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि अजित पवार गटात पोस्टर वॉर रंगण्याची चिन्हं आहे. माझ्या विचारांशी द्रोह करणार्‍या लोकांनी मी जिंवत असताना माझा फोटो वापरू नये, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला फटकारलं होतं. तसेच जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असलेल्या पक्षाने माझा फोटो वापरावा, असंही शरद पवारांनी म्हटलं होतं. परंतु बुधवारी अजित पवार गटाच्या कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो वापरण्यात आला होता. त्यानंतर माझंच नाणं खणखणीत असल्याने त्यांना माझा फोटो वापरावा लागत असल्याचं टोला शरद पवारांनी अजित पवार गटाला हाणला होता. राष्ट्रवादीच्या बंडानंतर दोन्ही गटात पोस्टरवरून संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS