Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोज मासे खात असल्यामुळेच ऐश्‍वर्याचे डोळे सुंदर

भाजपचे मंत्री विजयकुमार गावित यांचा अजब दावा

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपच्या एका मंत्र्याने बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयचे डोळे सुंदर असण्यामागे ती दररोज मासे खात असल्याचे अजब कारण दिले आहे.

माउली दादांच्या पुण्यतिथी निमित्त कवडगाव ते चाकरवाडी पायी दिंडी सोहळा
बंडखोर कॉंग्रेसच्या उमेदवाराला कॉंग्रेसचा पाठिंबा नाही – नाना पटोले 
साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी तिपायले

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपच्या एका मंत्र्याने बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयचे डोळे सुंदर असण्यामागे ती दररोज मासे खात असल्याचे अजब कारण दिले आहे. भाजपचे मंत्री विजय कुमार गावित यांनी हा दावा केला आहे. धुळे जिल्ह्यातील मच्छीमार समाजाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी एक विधान केले आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावित हे या कार्यक्रमात मासे खाण्याचे महत्त्व आणि फायदे सांगत होते. बोलण्याच्या ओघात त्यांनी जाहीर सभेत ऐश्‍वर्या रायच्या सुंदर डोळ्यांविषयी भाष्य केले. ‘तुम्ही ऐश्‍वर्या रायचे डोळे पाहिले असतील. ते खूप सुंदर आहेत. ती कर्नाटकातील मंगळुरूच्या किनारी भागात लहानाची मोठी झाली. ती रोजच्या रोज मासे खायची आणि त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत,’ असे गावित म्हणाले. ’माशांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मासे खाल्ल्याने त्वचाही सुधारते. डोळ्यांना आणि त्वचेला खूप फायदा होतो, असेही गावित यांनी सांगितले. इतकेच बोलून गावित थांबले नाहीत तर त्यांनी तरुणांना मासे खाण्याचा सल्लाही देऊन टाकला. ’तरुण मुला-मुलींनी मासे खाल्ले तर त्यांचे डोळेही सुंदर दिसतील आणि ते मुलींची मने सहज जिंकू शकतील, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात गावित यांच्या हस्ते धुळ्यातील मच्छिमारांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्याच आले. विजयकुमार गावित हे नंदुरबारचे भाजपचे आमदार आहेत. ते उत्तर महाराष्ट्रातील वजनदार आदिवासी नेते मानले जातात. त्यांच्या कन्या हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. गावित हे भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

COMMENTS