मुग्धाची कविता’ हे बाल साहित्यातील आश्वासक पाऊल – प्रा.दासू वैद्य.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुग्धाची कविता’ हे बाल साहित्यातील आश्वासक पाऊल – प्रा.दासू वैद्य.

शेवगाव /प्रतिनिधी : 'निरागसता हे बालसाहित्याचे बलस्थान असून, व्यवस्थेला प्रश्न विचारून मुलांच्या भाव विश्वाने त्या व्यवस्थेचा केलेला अनोखा निषेध मोठ्

मोदींसमोरचे कौतुक ठरले फोल…ठाकरेंने आणले वास्तवात ;अहमदनगर जिल्ह्याची कोरोनाने केली ससेहोलपट
गाडीच्या पार्किंगवरून घातला वाद व पळवले पावणे दोन लाख…
मनपा प्रशासनाकडून महाविकास सत्तेवर बॉम्ब?

शेवगाव /प्रतिनिधी : ‘निरागसता हे बालसाहित्याचे बलस्थान असून, व्यवस्थेला प्रश्न विचारून मुलांच्या भाव विश्वाने त्या व्यवस्थेचा केलेला अनोखा निषेध मोठ्यांना समजून घेता आला पाहिजे हा विचार मांडत जिवंत भवतालाचा विचार करणारी ‘मुग्धाची कविता’ हे बाल साहित्यातील आश्वासक पाऊल आहे. असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक प्रा.दासू वैद्य यांनी केले. 
येथील बाळासाहेब भारदे हायस्कुलची विद्यार्थिनी मुग्धा उमेश घेवरीकर हिच्या ‘मुग्धाच्या कविता’ या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, जयंत येलूलकर, संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, प्रा.रमेश भारदे व ब्र. कु.पुष्पा बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणाले की,’शिक्षण म्हणजे अनेक कलांचा संगम असून वास्तवाला सत्याची जोड देत व्यवस्थेला हादरा देणारी मुग्धाची कविता  सकस व सशक्त बालसाहित्य ठरणार आहे’. इयत्ता दहावीच्या वर्गमित्रांनी केलेले या कार्यक्रमाचे अभिनव संयोजन हा उपस्थित व मान्यवरांच्या कौतुकाचा विषय ठरला. कार्यक्रमास शेवगाव मधील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या वर्गात शिकणारी कु. वेदिका कुलकर्णी हिने सादर केलेली कविता उपस्थितांची दाद मिळवून गेली. प्रास्तविक सिद्धी शेळके हिने तर सूत्रसंचालन राधिका अंचवले, समृद्धी वाळुंजकर यांनी केले तर सार्थक नाईकवाडी याने आभार मानले.

COMMENTS