Homeताज्या बातम्यामनोरंजन

ऐश्वर्याच्या चाहत्याचा अभिषेकला सल्ला

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांनी जोडी लोकप्रिय आहे. या दोघांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्य

सत्ता संघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तीकडेच
२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत 
दुसऱ्या महायुद्धात जगाला वाचविणारा रशिया, तिसऱ्या महायुध्दाच्या दिशेने ?

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांनी जोडी लोकप्रिय आहे. या दोघांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या लग्नाला आज इतकी वर्षे झाली तरी देखील त्यांच्यातील प्रेम कमी झालेलं नाही. ऐश्वर्यानं अभिषेकशी लग्न केल्यानंतर खूप कमी चित्रपट केले असं म्हणायला हरकत नाही. पण अनेकांना वाटलं की ऐश्वर्यानं लग्नानंतर कामातून ब्रेक घेतला आहे. दरम्यान, यासाठी अनेकांनी अभिषेकला कारणीभूत ठरवले आहे. एका नेटकऱ्यांनी यासाठी अभिषेकला कारणीभूत ठरवतं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहताच अभिषेकनं त्याला चोख उत्तर दिले आहे. अभिषेकनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पत्नी ऐश्वर्याच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटाविषयी एक कमेंट केली. अभिषेक या ट्वीटमध्ये म्हणाला, ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा एक अतिशय चांगला चित्रपट आहे. माझ्याकडे याबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी फार आनंदी आहे. मणीरत्नम, चियान, विक्रम, तृषा आणि सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. त्या सर्वांना शुभेच्छा. मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. तिचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम.’ अभिषेकचं हे ट्वीट पाहिल्यानंतर त्यावर एका नेटकऱ्यानं कमेंट करत ऐश्वर्या चित्रपट न करण्यासाठी त्याला कारणीभूत ठरवले आहे. ‘सर आता तुम्ही ऐश्वर्या रायला आणखी चित्रपट साईन करण्यास सांगायला हवं आणि तुम्ही आराध्याची काळजी घ्यायला हवी.’ नेटकऱ्याचं हे ट्वीट पाहता अभिषेक म्हणाला, ‘सर, तिने चित्रपट साईन करावेत?? तिला कोणतीही गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीची अजिबात गरज नाही. त्यात तिला आवडणारे काम करण्यासाठी तर नाहीच.’  अभिषेकच्या ट्वीटवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, पती असावा तर असावा. दुसरा नेटकरी म्हणाला, बरोबर म्हणालात सर. तिसरा नेटकरी म्हणाला, आम्ही तुम्हाला दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उस्तुक आहोत.

COMMENTS