Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध वाळूचा डंपर उलटून एकाचा मृत्यू

खैरी निमगाव येथील घटना ; चार जण गंभीर जखमी

निमगांव खैरी/प्रतिनिधी ः खैरी निमगांव येथे सकाळी सहाच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणारे अतिजलद डंपर उलटून त्याखाली एक जण दबून ठार झाल्याची घटना

मध्यप्रदेशात कार झाडावर आदळून 5 जणांचा मृत्यू
वसईजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
अपघातात शिक्षक पती-पत्नीचा मृत्यू

निमगांव खैरी/प्रतिनिधी ः खैरी निमगांव येथे सकाळी सहाच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणारे अतिजलद डंपर उलटून त्याखाली एक जण दबून ठार झाल्याची घटना गुरुवार (दि. 17) रोजी घडली आहे. शफीक अहमद पठाण उक्कलगांव असे वाळूच्या डंपरखाली दबून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गोदावरी नदी पात्रातून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रॅक्टरद्वारे तसेच डंपरद्वारे वाळू उपसा केला जातो. या भागात वाळूचे अनेक पाँईट असुन काही दिवसापुर्वी याच भागातील नायगाव डेपो शासनाने ताब्यात घेऊन वाळू धोरण राबवले होते. या धोरणानुसार नागरीकांना स्वस्तात वाळू मिळाली नसल्याने या धोरणात शासन अपयशी ठरल्याने चोरट्या वाळूला मागणी दिसुन आली आहे. असे असताना शासनाला हि चोरटी वाळू रोखता आली नाही. असाच वाळू उपसा करणारे विनाक्रमांकाचे डंपर गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नदीतून वाळू घेऊन येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने खैरी निमगांव येथे उलटले त्यात एकजण ठार झाला तर उर्वरीत चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना प्रत्यक्ष दर्शींच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात शासनाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून रोज शेकडो ट्रॅक्टरने आणी  डंपरने हजारो ब्रास वाळू उपसा केला जातो. या वाळू उपसा करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीला तसेच डंपरला कुठल्याही प्रकारचा क्रमांक आढळून येत नाही. वाळू तस्करी करणार्‍या चालक व मालकाचे अधिकार्‍यांशी संगनमत असल्याने हा धंदा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

COMMENTS