विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा जेरबंद

Homeताज्या बातम्या

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या युवकाला नगर तालुका पोलिसांनी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथून अटक केली. अभिमन्यू शिवराम भोसल

‘अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा’ I LOKNews24
शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज – अक्षय वाकचौरे
राहुरीत दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या युवकाला नगर तालुका पोलिसांनी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथून अटक केली. अभिमन्यू शिवराम भोसले (रा. देऊळगाव सिध्दी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे माहेरी आलेल्या शीतल चव्हाण या विवाहितेला अभिमन्यू भोसले त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शीतलने पेटवून घेतले होते. तिला उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे तिने नगर तालुका पोलिसांना जबाब दिला होता. त्या जबाबावरून भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारादरम्यान शितलचा मृत्यू झाला होता, गुन्हा दाखल होताच अभिमन्यू पसार झाला होता. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पोलिस उपअधीक्षक अजित पाटील व सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार कदम, दहिफळे,खिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS