Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरकरांच्या आनंदात खोडा घालण्याची स्टंटबाजी ः सोमेश्‍वर दिवटे

संगमनेर/प्रतिनिधी ः काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज या हॅप्पी हायवेच्

आ. राणेंचे नगर लक्ष ठरणार…विखे-जगतापांना अडचणीचे?
प्रोजेक्टचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हावे ः नितीनदादा कोल्हे
अकोल्यात वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

संगमनेर/प्रतिनिधी ः काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज या हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवे च्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र हा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला .आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात ही प्रसिद्धीसाठी केवीलवाणी स्टंटबाजी असल्याची टीका शहराध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे यांनी केली आहे .
सोमेश्‍वर दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरवासीय एकत्र येत हॅपी हायवेचा मोठा आनंद सोहळा संपन्न झाला. या हवेच्या निर्मितीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून महाविकास आघाडी सरकारकडून 40 कोटी रुपये मिळवले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वैयक्तिक संबंधातून 25 कोटी रुपये मिळवले. या दोन्ही निधीतून हॅपी हायवे झाला आहे. सुशोभीकरणासह पथदिवे , दुभाजक, पादचारी मार्ग, वृक्षारोपण यामुळे हा रस्ता मॉडेल रस्ता ठरला आहे. या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात भर पावसात संपूर्ण संगमनेरकर, सर्व सेवाभावी संस्था मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. बालक, तरुण, नागरिक, महिला यांनी विविध उपक्रम घेऊन हा आनंदोत्सव साजरा केला. भर पावसात संगमनेर करांचा उत्सव व आनंद काही लोकांना पहावला नाही. त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत अधिकार्‍यांना दमदाटी करून हे पद दिवे बंद ठेवण्यासाठी षडयंत्र केले. तेच लोक आज पथदिवे सुरू करण्यासाठी निवेदन देत आहेत. ही फक्त प्रसिद्धीसाठी केविलवाणी स्टंटबाजी आहे.

COMMENTS