Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 स्व.अजित पवारांच्या स्मारकासाठी पालिकेने जागा द्यावी : भापकर

पाथर्डी : पाथर्डी शहरासह राज्याच्या विकासात स्व. अजित पवार यांचे मोठे योगदान असून त्यांचे पाथर्डी शहरात होणाऱ्या स्मारकासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेविका सविता भापकर यांनी केली.  या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिलेल्या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की राज्याचे अर्थमंत्री म्हणून पवार यांनाही आपल्या तालुक्याला विशेषतः पाथर्डी शहरातील अनेक विकासकामांना मोठा निधी दिला आहे. त्यांनी दिलेल्या निधीतूनच पाथर्डी शहरात पालिकेची भव्य वास्तू  उभी राहिली आहे. या शिवाय राज्यातील शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते. पवार यांचे स्मारक व्हावी अशी इच्छा आमदार शिवाजीराव गर्जे यांनी सुद्धा व्यक्त केली आहे. पालिकेने या स्मारकासाठी जागा दिल्यास ती पवार यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरणार असल्याने तातडीने पालिकेने स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेवटी भापकर यांनी केली आहे.

अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा
भालगावातील जमीन मोजणी प्रकरणी वाद; हद्दीखुणांमध्ये तफावत; भूमीअभिलेख अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आरोप
अल्पवयीन मुलीशी विवाह; नवरदेवासह पाच जणांविरोधात गुन्हा

पाथर्डी : पाथर्डी शहरासह राज्याच्या विकासात स्व. अजित पवार यांचे मोठे योगदान असून त्यांचे पाथर्डी शहरात होणाऱ्या स्मारकासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेविका सविता भापकर यांनी केली.

 या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिलेल्या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की राज्याचे अर्थमंत्री म्हणून पवार यांनाही आपल्या तालुक्याला विशेषतः पाथर्डी शहरातील अनेक विकासकामांना मोठा निधी दिला आहे. त्यांनी दिलेल्या निधीतूनच पाथर्डी शहरात पालिकेची भव्य वास्तू  उभी राहिली आहे. या शिवाय राज्यातील शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते. पवार यांचे स्मारक व्हावी अशी इच्छा आमदार शिवाजीराव गर्जे यांनी सुद्धा व्यक्त केली आहे. पालिकेने या स्मारकासाठी जागा दिल्यास ती पवार यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरणार असल्याने तातडीने पालिकेने स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेवटी भापकर यांनी केली आहे.

COMMENTS