Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात तरुणाचा धारदार शस्त्राने खून

पुणे ः दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पुण्यात नुकतेच एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्यास गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता सिग

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून हत्या
मुंबईमध्ये फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या
पुण्यात कोयत्याने वार करून तरूणाची हत्या

पुणे ः दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पुण्यात नुकतेच एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्यास गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता सिगारेट पिण्याकरिता पैसे न दिल्याने पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जीवे ठार मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. याप्रकरणी महेश शिंदे, मंगेश रविंद्र जाधव (वय-20, दोघे रा.रामटेकडी,हडपसर,पुणे) व आयुशे रविंद्र काळे (22,रा.कोंढवा,पुणे) या आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी आरोपी मंगेश जाधव व आयुशे काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सिध्दार्थ विठोबा शिवशरण (60) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार 14 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता रामटेडकडी परिसरात आदिनाथ सोसायटी जवळ घडला आहे. तक्रारदार सिध्दार्थ शिवशरण यांचा मुलगा रोहित शिवशरण (वय-27) हा त्यांचे बहिणीच्या घरुन धुतलेले कपडे घेवून घटनेच्या दिवशी घरी परतत होता. त्यावेळी संबंधित तीन आरोपींनी त्यास रस्त्यात अडवुन सिगारेट पिण्याकरिता पैसे मागितले. परंतु रोहित याने सदर आरोपींना सिगरेटसाठी पैसे न दिल्याचा रागातून आरोपींनी कोणत्यातरी लोखंडी धारदार शस्त्राने पाठीमागुन येवुन त्याचे डोक्यात, कमरेत व पाठीत वार करुन त्यास गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस गिरमकर करत आहे. पाषाण सुस रोड परिसरात एका सोसायटीत राहणार्‍या जयश्री संतोष दांगट (वय-43 या 15 जानेवारी रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे जाऊ रेश्मा दांगट यांचेसोबत देवदर्शनाहुून दुचाकीवर घरी जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांचे जवळील दुचाकी वाहनावरुन येत सदर दोघींना थांबवून त्यांच्या गळयातील सव्वातीन लाख रुपयांचे 13 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसाकवून नेले आहे. याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS