Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्याचा फुगा डोक्यात लागल्याने तरूणाचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये मंगळवारी सर्वत्र धुळवडीचा आनंद साजरा करण्यात आला, मात्र या धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणारी घटना मुंबईतल्या विले पार्ल

LOK News 24 I“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा
स्वातंत्र्यदिनी मुळा धरण तिरंगा छटांनी भिजले
शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये मंगळवारी सर्वत्र धुळवडीचा आनंद साजरा करण्यात आला, मात्र या धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणारी घटना मुंबईतल्या विले पार्ले या ठिकाणी घडली आहे. मुंबईतल्या विले-पार्ले या ठिकाणी दिलीप धावडे या 41 वर्षीय तरूणाचा डोक्यात पाण्याचा फुगा लागल्याने मृत्यू झाला आहे. दिलीप धावडे हा तरूण एका शेअर ट्रेडिंग फर्ममध्ये काम करतो. रात्री 10.30 च्या सुमारास दिलीप धावडे आपल्या कुटुंबासाठी पुरणपोळी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे.
  दिलीप धावडे हे एका शेअर ट्रेडिंग फर्ममध्ये काम करत होते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते सोमवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास कुटुंबासाठी पुरणपोळी घेऊन येत असताना लहान मुले व मोठ्या माणसांचा गट एकमेकांवर पाणी भरलेले प्लास्टिकचे फुगे येणार्‍या-जाणार्‍यांच्या अंगावर फेकत होते. त्यातीलच एक फुगा धावडे यांच्या डोक्याला लागला आणि ते थेट खाली कोसळले. त्यांना हाका मारल्या, ते बेशुद्ध झालेत असे वाटून शुद्धीवर आणण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून स्थानिकांनी धावडेंना कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक भरत गुरव घटनास्थळी पोहोचले. अपघाती मृत्यूची नोंद करत धावडे यांचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. हा प्रकार जिथे घडला त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे नेमके काय घडले याबाबत प्रत्यक्षदर्शीकडे चौकशी सुरू आहे. विले पार्ले पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. आता पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत. दिलीप धावडे हे विले-पार्ले येथील शिवाजी नगर भागात असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास दिलीप धावडे हे पुरणपोळी घेऊन चालले होते. त्यावेळी स्थानिक लोक होळी पेटवून तो सण साजरा करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्यावर कुणीतरी पाण्याने भरलेला फुगा फेकला ज्यानंतर ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.  

COMMENTS