Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिक यांना तूर्तास दिलासा नाहीच

न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा 14 दिवसांची वाढ

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याच

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन
आमचा विरोध दर्ग्याला नाही तर विमानतळाला होणाऱ्या अडचणीला आहे – योगेश चिले
शेतकऱ्याच्या शेतात सापडली 47 पोती l पहा LokNews24

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले असले तरीही त्यांना अजुनही जामीन मिळालेला नाही. दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी मलिक अटकेत आहेत.
आतातर त्यांच्या जामीनावर लवकर सुनावणी होईल असे वाटत नाही. कारण त्यांची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठासमोर सुरू असतानाच आता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची बदली झाली आहे. ची गोवा खंडपीठात बदली झाल्याने मलिक यांना पुन्हा नव्या कोर्टाकडे जावे लागेल. मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयात मलिकांना आता नव्या बेंचपुढे दाद मागावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीस म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे, जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रींगप्रकरणीही नवाब मलिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.

COMMENTS