Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

मसूर / वार्ताहर : शिरवडे, ता. कराड येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय 14) हा ज्योर्तिलिं

पोतलेत स्वयंभू मारूती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला
बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘त्या’ योजनेचा लाभ
तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्‍याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले

मसूर / वार्ताहर : शिरवडे, ता. कराड येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय 14) हा ज्योर्तिलिंग विद्यालयामध्ये इसत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. येथील आपल्या मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या ओंकार याच्या निधनाची बातमी समजताच शिरवडे गावावर शोककळा पसरली. ओंकार हा चुणचुणीत, खेळकर असल्याने सर्वांचा लाडका होता.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ओंकार आपल्या चार मित्रांसोबत दुपारी दोन-अडीचच्या सुमारास कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहण्यास गेला होता. थर्माकोलच्या आधारे पोहण्याचा प्रयत्न करणार्‍या ओंकार याचा थर्माकोल सुटल्याने कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असणार्‍या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळून आला नाही. घाबरलेल्या मुलांनी याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली. यानंतर कराड येथील पाणबुड्यांच्या सहाय्याने ओंकारचा शोध घेण्यात आला. मात्र, दीड तासांपूर्वी बुडालेला मृतदेह पाणबुड्यांनी तत्काळ शोधून काढला. आपल्या एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर ओंकारच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. नदीपात्रात मुलगा बुडाल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली. यावेळी नागरिकांनी कृष्णा पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घटनेची नोंद तळबीड पोलीस स्टेशन येथे झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार काळे करत आहेत.

COMMENTS