Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येकाला मिळणार सुरक्षित घर  

नाशिक - अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 'रमाई आवास योजना'

‘सोनहिरा’ च्या अध्यक्षपदी आमदार मोहनराव कदम बिनविरोध
चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार
संगमनेरमध्ये दूध दरासाठी किसान सभेचे आंदोलन

नाशिक – अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ‘रमाई आवास योजना’ राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीना अडीच लाखांची आर्थिक मदत मिळत आहे. योजनेसाठी लागणाऱ्या निधीला मंजुरी मिळाल्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतीचे पक्क्या घरांचे स्वप्न साकार होत आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील कुटुंबाचे राहणीमान उंचवावे आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी शहरी भागांमध्ये ‘रमाई आवास योजना’ राबविली जात आहे. यामाध्यमातून आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या घराचे बांधकाम करू न शकणाऱ्यांना त्यांच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर या योजनेच्या माध्यमातून बांधून दिले जाते. रमाई आवाज योजनेसाठी समाजकल्याण आयुक्तालयाने सन २०२३-२४ या वर्षाकरिता ६० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांना नुकताच वितरित केला आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार राज्यासाठी साठ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून नाशिक विभागासाठी दोन कोटी २५ लाखांचा निधी मिळाला आहे. योजनेच्या माध्यमातून ३२३ (चौ.फू.) क्षेत्रफळ बांधकामासाठी प्रती लाभार्थी ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. यासाठी अर्जदाराची वार्षीक उत्पन्नाची मर्यादा ३ लक्ष आहे. महानगरपालिका व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात केली जात आहे.

अनुसूचित जातीच्या कुटुंबीयांना निधीचा आधार रमाई आवास योजनेतून अडीच लाखांची मदत कच्च्या घराच्या ठिकाणी उभारणार पक्के घरकुल

निधीचे वितरण

विभाग            निधी

पुणे               २१ कोटी

लातूर            २३ कोटी ५७ लाख ५० हजार

नागपूर।          १२ कोटी

नाशिक।         २ कोटी २५ लाख

मुंबई।              ७५ लाख

अमरावती।       ४२ लाख ५० हजार 

COMMENTS