Homeताज्या बातम्याविदेश

असीम मुनीर होणार पाकचे नवे लष्करप्रमुख

कराची वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या घटनेतील लष्करप्रमुख पदाला अनन्यसाधारण असे महत्व असून, नवे लष्करप्रमुख कोण होणार यावर चर्चा सुरु असतांना, लेफ्टन

उच्च न्यायालयात न्यायमूर्तीसमोरच आत्महत्येचा प्रयत्न
सत्ता स्थापनेचे चित्र आज होणार स्पष्ट | DAINIK LOKMNTHAN
सरपंचांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

कराची वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या घटनेतील लष्करप्रमुख पदाला अनन्यसाधारण असे महत्व असून, नवे लष्करप्रमुख कोण होणार यावर चर्चा सुरु असतांना, लेफ्टनंट जनरल असीम मुनीर(Asim Munir) हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असतील हे स्पष्ट झाले आहे. ते आयएसआयचे प्रमुख राहिले आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
असीम 2018-2019 मध्ये 8 महिने आयएसआयचे प्रमुख होते. सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांनी त्यांचे जवळचे सहकारी फैज हमीद यांना आयएसआय प्रमुख बनवले आणि मुनीर यांची गुजरांवाला कॉर्प्स कमांडर म्हणून बदली केली. असीम यांना 2018 मध्ये टू-स्टार जनरल पदावर बढती मिळाली होती, परंतु दोन महिन्यांनंतर ते या पदावर रुजू झाले. त्यांचा लेफ्टनंट जनरल म्हणून 4 वर्षांचा कार्यकाळ 27 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. जनरल मुनीर हे फ्रंटियर फोर्स रेजिमेंटचे सर्वात वरिष्ठ थ्री-स्टार जनरल आहेत. ते जनरल बाजवा यांच्या पसंतीचे आहेत. त्यांनी जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिगेडियर म्हणून त्यांनी काम केले आहे. नरल मुनीर हे फ्रंटियर फोर्स रेजिमेंटचे सर्वात वरिष्ठ थ्री-स्टार जनरल आहेत. ते जनरल बाजवा यांच्या पसंतीचे आहेत. त्यांनी जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिगेडियर म्हणून त्यांनी काम केले आहे.  मुनीर पाकिस्तानचे लष्करप्रमुख झाल्यानंतर भारतासोबतच्या संबंधांमध्ये कोणतेही महत्त्वाचे बदल होणार नाहीत. कारण 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात मुनीर यांचा हात होता. ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यावरून मुनीर यांची छापही दिसली. हा एक नियोजित हल्ला होता, जो नियोजन आणि प्रशिक्षणाद्वारेच शक्य होता.

COMMENTS