Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिरवली येथे सर्व रोग निदान शिबीरास प्रतिसाद

औसा प्रतिनिधी - लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लातूर युवक क

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची पंचक्रोशीत चर्चा
‘वंचित’ लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार
पाच लाखांची लाच घेताना लेखापरीक्षकाला अटक

औसा प्रतिनिधी – लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लातूर युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष अजित शिंंदे यांच्या संकल्पनेतून बिरवली येथे उजनी प्राथमिक आरोग्य केंद्र व लातूर ग्रामीण युवक कॉग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर झाले. या शिबीरांचे उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे हे होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण लोखंडे, भादा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे, सदाशिव कदम, कॉग्रेसचे औसा तालुकाध्यक्ष दंतोपंत सूर्यवंशी उपस्थित होते.
हे सर्व रोग निदान शिबिर उजनी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजपाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अबोली परूळकर,आरोग्य सहाय्यक संतोष तांदळे, यांनी रुग्णतपासणी केली. त्यांच्यासोबत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक योगेश गरड,अहिल्या काळे,के. जी निसाले,आशा स्वयंसेविका रंजना ग्रँड,महानंदा पांचाळ यांनी सहकार्य केले. या शिबिरात गावातील व परिसरातील जवळपास 240 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, दमा, कर्करोग, थायरॉईड, क्षयरोग आदी तपासण्या करण्यात आल्या तर इतर आजारांच्याही तपासण्या करण्यात आल्या. यास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या शिबीर उद्घाटनप्रसंगी विलासराव देशमुख युवा मंचचे अध्यक्ष रवि पाटील, माजी संचालक कृषी उत्पन बाजार समिती नामदेव माने,बिरवली गावच्या सरपंच अनिता चव्हाण टाकाचे सेवा सोसायटीचे चेअरमन गोरख सावंत, ग्रामसेवक कांबळे,उपसरपंच अमित पाटील, अप्पासाहेब घाडगे, शाम सूर्यवंशी, विठ्ठल पांचाळ, गुणवंत कदम, प्रल्हाद कदम,श्रीनिवास मुळे, राम भोंग, हरेर्श्वर करंडे तानाजी पाटील, बजरंग. कदम ,सचीन शिंदे,शुभम बाजुळगे,सोहेल तांबोळी,अल्ताफ शेख,बालाजी गरड,प्रसाद चव्हाण, अक्षय कदम यांच्यासह अनेक कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमांचे सुत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले तर प्रास्ताविक व आभार अजित शिंदे यांनी मानले.

COMMENTS