Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांचा 10 तारखेच्या होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

नाशिक प्रतिनिधी - स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचा पुढील दौरा नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघात होणार आहे या संदर्भात आज येवला य

बहिणीसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा मृत्यू | LOKNews24
चित्रपट पाहून सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या
Solapur : लक्झरी बस, ट्रॅक्टर धडकेत 2 ठार 7 जखमी | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचा पुढील दौरा नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघात होणार आहे या संदर्भात आज येवला येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुकास्तरीय आढावा बैठक पक्षाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 या बैठकी मध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे,राज्य कार्यकारिणी सदस्य विजय वाहुळे,नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात,नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ.रुपेश नाठे,नाशिक शहर व कसमादे विभाग जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे,जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ वैराळ,उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी मनोरमाताई पाटील,राज्य कार्यकारणी सदस्य पुष्पाताई जगताप,नाशिक महानगर प्रमुख महिला आघाडी निशिगंधा ताई पवार,आयटी विभाग वैभव दळवी,विष्णू पंत घुगे हे उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये छत्रपती संभाजीराजे हे गाव तिथे शाखा व घर तिथे स्वराज्याचा मावळा या अभियानांतर्गत स्वराज्य पक्षाचा विस्तार करण्यासाठी१० सप्टेंबरला येवला मतदारसंघाचा दौरा करणार आहे.या अनुषंगाने येवला मतदारसंघातील साधारणतः ३० गावांमध्ये स्वराज्यच्या शाखा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या संदर्भात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या.

प्रत्येक गावामध्ये तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणचे नियोजन कसे करावे तसेच गावनिहाय शाखा सदस्यांचे फॉर्म भरून नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच तालुक्या मध्ये सध्या असलेले महत्वाचे प्रश्न,यांसह वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न या संदर्भातली सर्व माहिती येत्या दोन तारखेपर्यंत निर्धारित करावी. त्याचबरोबर पक्षाच्या सभेचे ठिकाण या सगळ्या गोष्टींवर काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यां मार्फत देण्यात आल्या. या बैठकीचे यशस्वी नियोजन या विभागाचे जिल्हाप्रमुख डॉ रुपेश नाठे,ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ वैराळ येवला तालुका निमंत्रक आदित्य नाईक,गोरख संत यांनी केले होते.

या बैठकीला तालुक्यातील संदीप बरशिले,गोरख कोटमे,तुषार शिंदे,विकी कवाडे,निलेश राऊत,यादव येवले,प्रकाश मस्के, गोकुळ गांगुर्डे,प्रवीण कदम, श्यामसुंदर नवले,संदीप पवार,प्रसाद बानगुडे,रवी मेंगाने,कार्तिक भोसले, आकाश कुलकर्णी,अनिल गळगट,दीपक आरगडे,लक्ष्मण आरखडे,अनिल पाटील,मुकुंद भोसले,गणेश भोसले,ऋषिकेश गाडे,समाधान बानगुडे,सचिन दाने,सुनील बोराडे रवी घोरपडे,सतीश वाघ,शिवाजी घोरपडे, रोहिदास पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS