Homeताज्या बातम्याक्रीडा

पृथ्वी शॉचे रणजीमधील पहिले त्रिशतक

थोडक्यात हुकला 400 धावांचा विक्रम

मुंबई ः महाराष्ट्राच्या  पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. त्याने 383 चेंडूत 379 धावांची खेळी खेळली. रणजी ट्रॉफीच्या इत

मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान
सौरव गांगुलीच्या सुरक्षेमध्ये वाढ; बंगाल सरकारचा निर्णय
महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार : उपमुख्यमंत्री पवार

मुंबई ः महाराष्ट्राच्या  पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. त्याने 383 चेंडूत 379 धावांची खेळी खेळली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च खेळी आहे. त्यांच्या आधी बीबी निंबाळकर यांनी 1948-49 च्या हंगामात महाराष्ट्रासाठी 443 धावांची नाबाद खेळी खेळली होती.

पृथ्वीची धावसंख्या ही रणजी ट्रॉफीतील सलामीवीराची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने त्रिपुराच्या समित गोहेलचा विक्रम मोडला. गोहेलने 2016 मध्ये 359 धावांची नाबाद खेळी खेळली होती. गुवाहाटी येथे मुंबई आणि आसाम यांच्यात रणजी करंडक फेरीचा सामना खेळला जात आहे. मंगळवारी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 2 बाद 397 धावा केल्या. तेव्हा पृथ्वी 240 धावांवर नाबाद होता. बुधवारी पहिल्या सत्रात त्याने 326 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. तो 379 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 49 चौकार आणि 4 षटकार मारले. रणजी ट्रॉफीमधली ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने 2019-20 रणजी हंगामात बडोद्याविरुद्ध 202 धावा केल्या होत्या. दुसर्‍या सत्रापर्यंत मुंबईने 127 षटकांत 3 बाद 608 धावा केल्या आहेत. त्यांचा कर्णधार अजिंक्य रहाणे शतक झळकावल्यानंतर सरफराज खानसोबत खेळत आहे. या खेळीसह पृथ्वीने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या खेळाडूची सर्वोच्च धावसंख्याही केली. त्याआधी 1990-91 च्या मोसमात संजय मांजरेकरने मुंबईकडून हैदराबादविरुद्ध 377 धावा केल्या होत्या. या हंगामातील 4 पैकी 2 सामने जिंकून मुंबईचा संघ एलिट गट-ब च्या गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने एक सामना गमावला आणि एक ड्रॉही खेळला. संघाचे 16 गुण आहेत. या गटात 19 गुणांसह सौराष्ट्रचा संघ अव्वल स्थानावर आहे. या गटातील टॉप-2 संघ बाद फेरी खेळतील.

COMMENTS