भविष्यात ऑक्सिजनची आणखी टंचाई ; टोपे यांची भीती; साडेपंधराशे टन ऑक्सिजनचा दैनंदिन वापर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भविष्यात ऑक्सिजनची आणखी टंचाई ; टोपे यांची भीती; साडेपंधराशे टन ऑक्सिजनचा दैनंदिन वापर

ऑक्सिजन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, आपल्या स्वतःचे साडेबाराशे टन उत्पादन आहे.

केरळमधील ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली गरोदरपणाची गोड बातमी
संजय राऊत तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते ः केसरकर
फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेची 2 कोटींची वसुली

मुंबई/प्रतिनिधीःऑक्सिजन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, आपल्या स्वतःचे  साडेबाराशे टन उत्पादन आहे. हे तर आपण शंभर टक्के वापरत आहोतच; परंतु त्याचबरोबर साधरपणे 300 टन आपण बाहेरून आणतो आहोत. विशाखापट्टणम येथून रेल्वेने ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला परवानगी मिळालेली आहे; मात्र रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजनसाठी पुढे अडचण येऊ शकेल,  अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. 

राज्यातील वाढत असलेली कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेऊन, दुर्गम भागातील जिल्हाधिकार्‍यांचा संपर्क रोज मंत्रालयाशी होत नाही. अशा ठिकाणी पालक सचिवांनी अधिक सक्रिय राहून काम केले पाहिजे. जे पालक सचिव ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नेमलेल असतील, त्या सर्व पालक सचिवांनी सक्रिय राहून काम करावे आणि आपल्या जिल्ह्याच्या संपूर्ण कोविडच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. वाढत असलेली गर्दी व सध्याची परिस्थिती पाहता 30 तारखेपर्यंत निर्बंध जास्त कडक केले पाहिजेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. आपल्याला जर उद्देश साध्य करायचा असेल, तर विनाकारण फिरणार्‍या लोकांचा पायबंद केला पाहिजे. असे टोपे म्हणाले. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था ढासळण्याची भीती असून केंद्राकडे मदत मागितली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे. यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आले आहे. 22 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

COMMENTS