Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.शरद पवार यांच्या सभेच्या तयारीसाठी आज परळीत बैठक

परळी प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  खा.शरद पवार यांची बीड येथे आज सभा होणार असून या भव्य सभेच्या पूर्वतयारी करिता

मनीष सिसोदियांवर खटला चालवण्यास केंद्राची मान्यता
मंत्री भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या साहित्य प्रतिभेला पुरस्कार  

परळी प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  खा.शरद पवार यांची बीड येथे आज सभा होणार असून या भव्य सभेच्या पूर्वतयारी करिता शुक्रवार दि. 11 ऑगस्ट 2023  रोजी सायंकाळी 05.00 वाजता अक्षदा मंगल कार्यालय, परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष आ.संदीप भैया क्षिरसागर,  युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत होणार असून या बैठकीला परळी मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई रत्नाकर  गुट्टे, जेष्ठ नेते समदभाई शेठ, ऍड. जीवनराव देशमुख, महेबूब भाई कुरेशी, फिरोज सय्यद, शंकर शेजुळ यांनी केले आहे.
17 ऑगस्ट रोजी बीड येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा होणार असून त्या सभेच्या पूर्वतयारीसाठी परळी मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक परळी येथे होत आहे. या बैठकीमध्ये सभेच्या पूर्वतयारीच्या संदर्भामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष आ. संदीपभैया क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई रत्नाकर  गुट्टे.ज्येष्ठ नेते समदभाई शेठ, ऍड..जीवनराव देशमुख, महेबूब भाई कुरेशी, जमिल अध्यक्ष,विश्वनाथ देवकर,शंकर शेजुळ, सय्यद फिरोज यांनी केले आहे.

COMMENTS