Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंधार्‍यावरून लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद

राजूर पोलिसांची कामगिरी, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोले/प्रतिनिधी ः तालुक्यातील खडकी येथील बंधार्‍यावरुन 80 लोखंडी ढापे चोरीला गेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी  रामभाऊ इंद

वाळकी येथे भरदिवसा डोक्यात दगड घालून 35 वर्षीय तरुणाचा खून
सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

अकोले/प्रतिनिधी ः तालुक्यातील खडकी येथील बंधार्‍यावरुन 80 लोखंडी ढापे चोरीला गेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी  रामभाऊ इंदु पोरे यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे ढापे चोरी बाबत तक्रार दिली त्यावरुन राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं 200/2022 भा. द. वी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

अखेर सोमवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांना गोपनिय बातमी दारामार्फत माहीती मिळाली की, सहा महिण्यापूर्वी खडकी व शिसवद येथील बंधार्‍यावरील ढापे हे नामे राजाराम तातळे, यांने चोरले बाबत माहीती मिळाली सदर माहीती तसेच तांत्रीक विशलेषन करुन सदरचा गुन्हा हा राजाराम नारायण तातळे यांनी केल्या बाबत खात्री झाल्याने राजाराम नारायण तातळे, वय 39 वर्ष, रा. तातळेवाडी, बिरगावतराळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक यास चौकशी कामी ताब्यात घेवून त्यास सदर घटने बाबत सखोल चौकशी केली असता सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्‍वासात घेतले असता त्यांने त्यांच्या साथीदारच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्याचे साथीदार नामे शंकर सावकार आढळ, वय 35 वर्ष, रा. निनावी, ता. इगतपुरी, जि. नाशिक, व ज्ञानेश्‍वर अनाजी बगाड, वय 22 वर्ष, रा. निनावी, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत. सदर आरोपी यांच्याकडुन गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन महिंद्रा बोलेरो कंपनी च्या पिकअप तसेच एक ऑक्सीजन गॅसची टाकी, एच पी कंपनीची घरगुती वापराची गॅसची टाकी, गॅस कटर, लोखंडी कटर असा एकूण 12 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव, शिर्डी, चार्ज संगमनेर विभाग संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक जी.एफ शेख, पोहेकॉ विजय मुंढे, पो हे कॉ कैलास नेहे, पो ना दिलीप डगळे, पो ना पटेकर, पो कॉ संभाजी सांगळे, पो कॉ अशोक गाढे, पो कॉ विजय फटांगरे, पो कॉ सुनिल ढाकणे, पो कॉ साईनाथ वर्पे, पोकोंअशोक काळे, अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर येथील नेमणुकीचे पो ना फुरकान शेख यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ  विजय मुंढे हे करत आहेत.

COMMENTS