Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यातील लक्ष्मी निवास गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीत सागर मैड विजयी

अकोले/प्रतिनिधी ः अकोले शहरातील ख्यातनाम लक्ष्मी निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत फक्त एकाच जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सागर तथा श्रीकांत सुधाक

श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासींना टँकरने पाणी द्या
दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे प्राण वाचले l पहा LokNews24
Ahmednagar : शहरात भाजप आक्रमक… राज्य सरकारचा निषेध… जशास तसे उत्तर देण्याचा इशारा l Lok News24

अकोले/प्रतिनिधी ः अकोले शहरातील ख्यातनाम लक्ष्मी निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत फक्त एकाच जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सागर तथा श्रीकांत सुधाकर मैड हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांनी त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार की, जे अकोले नगरपंचायतमधे भाजपचे विद्यमान नगरसेवक व पाणीपुरवठा समितीचे सभापती आहेत ते हितेश कुभांर यांचा दारूण पराभव केला. लक्ष्मीकांत मैड तब्बल 19 मते मिळवून निवडून आले. सागर मैड यांनी गृहनिर्माण सोसायटीतील निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. सभासद व उमेदवारांसोबत उत्तम समन्वय साधून लक्ष्मी निवास गृहनिर्माण संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड सुधीर गणपत शेटे यांनी स्थानिक राजकीय दबावगटाला झुगारून पारदर्शक व उत्तम कामकाज पाहीले. त्यांना मतदान केंद्र प्रमुख बाळासाहेब बडदे व सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल वर्पे व किसन शेळके आणि सुरेश करवा यांनी सहकार्य केले. शेवटपर्यंत तणाव जाणवत असलेल्या या संस्थेची निवडणूक अखेरपर्यंत खेळीमेळीत पार पडली.

अकोले तालुक्यातील सर्वात मोठी व एकमेव 7 मजली गृहनिर्माण सहकारी सोसायटी असलेल्या अकोले शहरातील शनी मंदिर परिसरातील ख्यातनाम लक्ष्मी निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, लिमिटेड, अकोलेची सन 2022-27 पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक रविवारी (29 जानेवारी) सकाळी 8 ते दूपीरी 4 वाजेपर्यत घेण्यात आली. लक्ष्मी निवास गृहनिर्माण सहकारी सोसायटीतील संचालक मंडळातील एकूण 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ वगळून इतर सर्व मतदारसंघातून बिनविरोध उमेदवार निवडणूक देण्यात आले. मात्र इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून अकोले नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक व शहर नळपाणी पुरवठा समितीचे सभापती असलेले लक्ष्मी निवास गृहनिर्माण सोसायटीचे सभासद व उमेदवार हितेश रामकृष्ण कुभांर व सुवर्णकार व्यावसायिक सागर तथा लक्ष्मीकांत सुधाकर मैड यांच्यातील तीव्र मतभेदाने जागा बिनविरोध होऊ न शकल्याने त्यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत हितेश कुभांर यांचा दारूण पराभव झाला. यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेल्यांत सर्वसाधारण मतदार संघातून अ‍ॅड वसंतराव नबाजी मनकर, विजयराव काशीनाथ पोखरकर, रुबिना इम्रान तांबोळी, इरफान मोहम्मद कुरेशी, सुभाष साहेबराव घाडगे, सौ. प्रतिभा वसंतराव मनकर यांचा समावेश आहे. तर महिला राखीव मतदारसंघातून स्वप्नजा ज्ञानेश्‍वर पतंगे, मंगल नवनाथ क्षीरसागर या बिनविरोध ठरल्या. जातीजमाती मतदारसंघातून सुनिल विठ्ठल लांघी व विज/भिज/विमाप्र मतदारसंघातून पियंका मोहन माने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. पण फक्त इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून सागर तथा लक्ष्मीकांत सुधाकर मैड व हितेश रामकृष्ण कुभांर यांच्यात सरळ लढत झाली. या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल 10 बिनविरोध संचालकांसह निवडणुकीत बाजी मारून नगरसेवक हितेश कुभांर यांचा दारूण पराभव करणारे लक्ष्मीकांत मैड यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.

COMMENTS