Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी गुन्हे दाखल

पुणे : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेच

कर्जमाफीच्या अटींविरोधात किसान सभेचे राज्यभर तीव्र आंदोलन; आज पुणे येथे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना देणार निवेदन
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

पुणे : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवले पुलावर मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या पुण्यातील नवले पुलावर मराठे आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. नवले पुलावर टायरची जाळपोळ करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने नवले पुलाजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होते त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पुण्यातील नवले पुलावर काल दुपारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही तरुणांनी नवले पुलावर आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मुंबई बेंगलोर महामार्गावर टायर जाळण्यात आली होती. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कलम 336 आणि कलम 441 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  

COMMENTS