देशात कोरोनाचे 4041 नवे रुग्ण

Homeताज्या बातम्या

देशात कोरोनाचे 4041 नवे रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 जणांचा मृत्यू आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त

जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या
पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या | LOK News 24
रायगड जिल्ह्यातील रत्नदुर्ग

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 जणांचा मृत्यू आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे. आधीच्या दिवशी देशात 3712 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा 4 हजारांवर पोहोचला आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 25 हजाप 379 नमुने तपासण्यात आले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

COMMENTS