Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज ; जागरूक नागरिक मंचाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 4 हजारापेक्षा जास्त झाले असल्याने नगर शहरासाठी व जिल्ह्यासाठी तातडीने कडक लॉकडाऊन ची गरज असताना शासनाकडून ऑल इज वेल अशा थाटात डोळेझाक का केली जाते आहे, असा सवाल येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी केला आहे.

महावितरणची डिजीटलायजेशनकडे वाटचाल
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून किचनमध्ये पुरला मृतदेह l पहा LokNews24
अहमदनगरमध्ये 2 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 4 हजारापेक्षा जास्त झाले असल्याने नगर शहरासाठी व जिल्ह्यासाठी तातडीने कडक लॉकडाऊन ची गरज असताना शासनाकडून ऑल इज वेल अशा थाटात डोळेझाक का केली जाते आहे, असा सवाल येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी केला आहे. नगर शहर व जिल्ह्यात तातडीने लॉकडाऊन केेले जावे व कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव  रोखावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल पाठवून केली आहे.

यासंदर्भात पाठवलेल्या ई-मेलमध्ये मुळे यांनी म्हटले आहे की, मागील वर्षी याच काळात अहमदनगर जिल्ह्यामध्ये फक्त 26 रुग्ण होते. तेव्हा पूर्णतः लॉक डाऊन करून रस्त्यावर शुकशुकाट होता. सगळे व्यवहार बंद होते आणि आजच्या स्थितीत गुरुवारी उच्चांकी 24 तासात 1326 रुग्ण आढळले व शुक्रवारी साडेआठशेवर नवे रुग्ण आढळले असतानाही सगळं ऑल इज वेल अशा थाटात चालू आहे. आतापर्यंत संपूर्ण देशाची परिस्थिती पाहता फक्त मार्च महिन्यामध्ये देशांमध्ये 1 लाख 16 हजार रुग्ण सापडले. त्यापैकी 44 हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आणि त्यातील जवळ जवळ एकतृतीयांश रुग्ण फक्त नगर जिल्ह्यात सापडले. तरीही ही गंभीर परिस्थिती नाही, असे एखादा कुठला मंदबुद्धी व्यक्ती देखील म्हणू शकणार नाही. लोकप्रतिनिधींना फक्त मतदारांच्या खुषमस्करीशी घेणे-देणे आहे. वास्तविक परिस्थिती कुणी मांडून कटू, पण लोकाभिमुख निर्णय घेतील अशी अजिबात शक्यता नाही, असा उद्वेगही या पत्रात त्यांनी व्यक्त केला आहे. परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेल्यावर शासनाला पुन्हा एकदा आपल्या तोकड्या मर्यादा उघड्या पाडून स्वतःचे हसे करून घ्यायचं नसेल तर आत्ताच तातडीने कडक लॉकडाऊनची नगर शहर व जिल्ह्यात आवश्यकता आहे. अन्यथा, येत्या पंधरा-वीस दिवसात अहमदनगर शहराची लोकसंख्या आणि आढळलेल्या करोना रुग्णांची संख्या एकच असेल, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. त्यामुळे राजकारण आणि मतदारांत लोकप्रियता, मतदारांची नाराजी हे शब्द बाजूला ठेवून तातडीने उपाययोजना करावी, अशी कळकळीची विनंती आहे, असेही मुळे यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

…तर, तो आदेश येणे अपरिहार्य

मुख्यमंत्र्यांना पाठवलेला ई-मेल मुळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनादेखील पाठवला असून, तातडीने निर्णय घ्यायची मागणी केली आहे. लॉक डाउन लावण्यामध्ये सामान्य जनतेचा रोष नको म्हणून

सगळेच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकमेकांचे आदेश येण्याची वाट पाहत बसले तर सर्वानाच थेट यमाचा आदेश येणे अपरिहार्य आहे, अशी भावनाही त्यांनी यात मांडली आहे.

छावा संघटने़कडूनही मागणी

अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्ह्यात एक आठवड्याचे लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात एक आठवड्याचे लॉकडाऊन करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेख सांगळे, जिल्हा दक्षिण सचिव गणेश गायकवाड, राहुल देशमुख, अच्युत गाडे, मुयर पवार, नितीन पोटे आदी उपस्थित होते. मागील तीन दिवसात जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दर दिवसाला रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 25 मार्चला विक्रमी तेराशे रुग्ण आढळून आले. शेजारील बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्रात विविध ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. शासकीय सुट्ट्या येत असल्याने शहरात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात 28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत एक आठवड्याचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

COMMENTS