Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या हत्येप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला अटक

मुंबई : सांताक्रुझ येथे महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी व मृत महिलेमध्ये प्रेम

दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील ग्रामस्थांचे हक्क अबाधित राहतील : दत्तात्रय भरणे
राष्ट्रीय युवा महोत्सव सर्वांच्या उस्फूर्त सहभागातून उत्साहात साजरा करावा – मंत्री गिरिश महाजन            
तृणमूलचा काँगे्रसला धक्का

मुंबई : सांताक्रुझ येथे महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी व मृत महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. पण वैद्यकीय अहवाल व तपासात महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मरियम बीबी (33) असे मृत महिलेचे नाव असून ती लोटस इमारतीच्या बांधकाम ठिकाणावर राहत होती. तिच्यासोबत आरोपी शहाबुद्दीन नजरूल गाजी (30) राहत होता. आरोपीने 18 सप्टेंबरला मरियमचे तोंड उशीने दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तो काहीही न सांगता तेथून निघून गेला. तात्काळ महिलेला कुपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली होती. पण संशयीतरित्या महिलेचा मृत्यू व त्यानंतर तिच्या सोबत राहणारा गाजी गायब झाल्यामुळे पोलिसांना हत्येचा संशय होता. वैद्यकीय तपासणीत महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून गाजीला राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS