Homeताज्या बातम्यादेश

शेतकरी राजधानीत रेल्वे, बसमधुन घुसणार

नवी दिल्ली ः किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच इतर म

महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
बीजमाता राहीबाई पोपेरे यांची अनोखी दिवाळी; बियाणेरुपी दिवा आणि आरास करून साजरी
लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणीसौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करण्याची मागणी – डॉ.गणेश ढवळे

नवी दिल्ली ः किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच इतर मागण्यांसाठी शेतकरी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. मात्र शेतकर्‍यांनी आता पुढील दिशा ठरवली असून, शेतकरी राजधानीमध्ये रेल्वे आणि बसमधून दाखल होणार आहेत. शेतकरी 10 मार्च रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन करणार आहेत. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले, पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवरून शेतकर्‍यांना पुढे सरकू दिले जात नाही. त्यामुळे 6 मार्च रोजी देशातील इतर राज्यांमधील शेतकरी बस आणि रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर सरकारविरोधात आंदोलन करतील. परंतु, पंजाबचे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरच आंदोलन करतील. शंभू आणि खनौरी सीमेवरील आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी आंदोलक शेतकर्‍यांची संख्या अधिक वाढवली जाणार आहे.

COMMENTS