Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस चौकीसमोर तरुणाने घेतले पेटवून

पुणे ः पुण्यात एका तरुणाने पोलिस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आ

राष्ट्रीय तपास यंत्रणाचे देशभर छापे
स्वतंत्र भारत पक्षाने दिले सिंग, पवार व भुसेंना धन्यवाद ; कांदा खरेदी निर्णयाबद्दल कृतज्ञता
डॉ. बाबुराव उपाध्ये यांना साहित्यभूषण पुरस्काराबद्दल गौरव  

पुणे ः पुण्यात एका तरुणाने पोलिस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहिदास अशोक जाधव ( वय 28, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुण राहत असलेल्या ठिकाणी तेथील अन्य व्यक्तींकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता. त्या व्यक्तींशी गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे वाद सुरू होते. अशात त्याच व्यक्तींकडून काही दिवसांपूर्वी त्याला मारहाण झाली होती.

COMMENTS