Homeताज्या बातम्यामनोरंजन

द केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा लग्न करणार!

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री अदा शर्मा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्रीला ‘द केरळ स्टोरी’ सि

महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही ; आदित्य ठाकरेंचा पलटवार! | LOKNews24
ग्रंथ व वृक्ष दिंडी आयोजन करून 130 वृक्ष विद्यार्थ्यांना वाटप…
वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कोतवालीची कारवाई

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री अदा शर्मा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्रीला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. आज अदा शर्मा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकरल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते आजही अदा हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत . इंन्स्टाग्रामवर अदा शर्मा हिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अदा अनेक बंदूक घेत निशाणा साधताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘अदा का स्वयंवर’ असं लिहिलं आहे. कॅप्शनमुळे अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. शिवाय ‘योग्य व्यक्ती नाही तर, योग्य बंदूक निवडत आहे..’ असं देखील अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अदा शर्मा हिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अदा लवकरच आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत. त्यामुळे अदा आगामी सीरिजची कधी घोषणा करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS