Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सर्वोदय विदया मंदिरचे सुयश

अकोले/प्रतिनिधीः अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविदयालय राजुर येथे नुकत्याच संपन्न झाल्या.या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धां

गांधी जयंतीनिमित्त तरडगाव ग्रामस्थांनी घेतली ग्रामस्वच्छतेची शपथ
प्रा. कैलास पवार यांना मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी ः मेजर नंदकुमार सैंदोरे
बाळ बोठेला दणका…जामीन अर्ज फेटाळला…

अकोले/प्रतिनिधीः अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविदयालय राजुर येथे नुकत्याच संपन्न झाल्या.या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांत सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजुर या विदयालयाने नेत्रदिपक कामगिरी करत तालुकास्तरावर घवघवित यश संपादन केले आहे.
या स्पर्धांत 14 वर्षे मुले फ्रीस्टाईल 35 किलो वजन गटात प्रणव बोर्‍हाडे याने प्रथम क्रमांक मिळवला,तर 38 किलो वजन गटात यश चौधरी याने प्रथम क्रमांक पटकवला,41 किलो वजन गटात सार्थक चौधरी प्रथम क्रमांक मिळाला, सार्थक सदगिरला द्वितिय क्रमांकवर समाधान मानावे लागले.तर 48 किलो वजन गटात साई नागरे याने प्रथम क्रमांक मिळवला. तर 62 किलो वजन गटात साईनाथ जाधव प्रथम व 68 वजन गटात संग्राम फडतरे प्रथम क्रमांक मिळविला.
17 वर्षाखालील मुले फ्रीस्टाईल 41 ते 45 किलो वजन गटात जयेश बोर्‍हाडे प्रथम,अधिराज देशमुख द्वितीय क्रमांक, 48 किलो वजन गटात प्रतिक दातखिळे प्रथम क्रमांक, 51 किलो वजन गटात समिर खाडगिर प्रथम, समिर धिंदळे द्वितीय क्रमांक,60 किलो वजन गटात सार्थक ढोकणे प्रथम, 65 किलो वजनगटात सार्थ दहिफळे प्रथम, 71 किलो वजन गटात भैरवनाथ शेंडगे याने प्रथम क्रमांक मिळविला.80 किलो वजन गटात प्रणव पुंडे प्रथम, ईश्‍वर जगदाळे द्वितीय क्रमांक मिळवला. 17 वर्षाखालील मुलींमध्ये फ्रीस्टाईल 43 किलो वजन गटात ईश्‍वरी जाधव प्रथम क्रमांक. 17 वर्षाखालील मुलांमध्ये ग्रीकोरोमन प्रकारात 41 ते 45 वजनगटात निलेश लोहरे याने प्रथम क्रमांक मिळविला.19 वर्षे मुले फ्रीस्टाईल प्रकारात 57 किलो वजन गटात शिवम हिले प्रथम, शंकर सोडनर द्वितीय क्रमांक, 61 किलो वजन गटात ज्ञानेश्‍वर देशमुख प्रथम,65 किलो वजन गटात तेजस लोटे प्रथम,74 किलो वजन गटात जयेश सुकटे प्रथम,97 किलो वजन गटात आयुष दातखिळे प्रथम, मुलींमध्ये 53 किलो वजन गटात दिक्षा सोनवणे प्रथम क्रमांक मिळविला. सर्व गुणवंत खेळाडूंना क्रिडा शिक्षक जालिंदर आरोटे, विनोद तारू,तान्हाजी नरके यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व कुस्तीपट्ट राजुर येथील अ‍ॅड.एम.एन. देशमुख महाविदयालयातील साई कुस्ती केंद्रात सराव करतात.
 विद्यार्थ्यांच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहरराव देशमुख,सचिव टि.एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन, संचालक मिलिंद उमराणी, मारूती मुठे, अशोक मिस्त्री, विजय पवार,विलास पाबळकर, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्रकाश महाले, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS