Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरुख खानची चाहत्यांना वाढदिवसानिमित्त भेट, ‘डंकी’चा शानदार टीझर रिलीज

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा बादशाह किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज म

अकोले तहसीलमध्ये मंगळवारी ग्राहक दिनाचे आयोजन
पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक
नाशिकमधून संशयित दहशतवादी ताब्यात

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा बादशाह किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज मिळालं आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘डंकी’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘डंकी’चा धमाकेदार टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. किंग खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. त्याचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे सिनेमे चाहत्यांच्या भेटीला आले असून हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला आहे. आता अभिनेत्याच्या आगामी ‘डंकी’ या सिनेमाची चाहत्यांना खूपच प्रतीक्षा करावी लागत आहे. टीझर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची मोठी उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘डंकी’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर शेअर करत असताना किंग खानने लिहिलं आहे की, “स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या साध्या आणि वास्तविक लोकांची गोष्ट. मैत्री, प्रेम आणि नातं म्हणजेच कुटुंब. हृदयस्पर्शी कथाकाराची हृदयस्पर्शी कथा. या प्रवासाचा एक भाग बनणे हा एक सन्मान आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आमच्यासोबत असाल. येत्या नाताळामध्ये ‘डंकी’ जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

COMMENTS