Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारताचा वाढता प्रभाव

जी-20 परिषद भारतात संपन्न होत असून, या परिषदेचे यजमानपद अर्थात अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्ताने भारताचे जागतिक पातळीवर भारताचे महत्व पुन्हा ए

आजची महिला आणि सक्षमीकरण
राष्ट्रवादीचा निकाल
खडसेंसाठी इकडे आड तिकडे विहीर !

जी-20 परिषद भारतात संपन्न होत असून, या परिषदेचे यजमानपद अर्थात अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्ताने भारताचे जागतिक पातळीवर भारताचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होतांना दिसून येत आहे. खरंतर भारताला स्वातंत्र्य मिळून उणेपूरे 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र या 75 वर्षांमध्ये भारताने साधलेली प्रगती दैदिप्यमान अशीच राहिली आहे. आज जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. भारत आज सर्वंच क्षेत्रात पुढारलेला आणि स्वयंपूर्ण देश आहे. शिवाय भारतामध्ये असलेले प्रचंड मनुष्यबळ आणि भली मोठी बाजारपेठ यामुळे अनेक देशांच्या नजरा भारतावर खिळल्या नसतील तर नवलच. भारत ही नव्याने उदयास येत असलेली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जी-20 परिषदेत भारताचा प्रभाव सहजपणे जाणवतांना दिसून येत आहे. भारताला प्रथमच जी-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. जी-20 हा अशा देशांचा समूह आहे, ज्याचे आर्थिक सामर्थ्य जगातील एकूण सकल उत्पादनापैकी 85 टक्के सकल उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील 75 टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व केले जाते. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील दोन तृतीयांश लोकवस्ती आहे. त्यामुळे या परिषदेला विशेष महत्व प्राप्त होत आहे. या 20 देशांमध्ये आर्थिक व्यवहारांचा, आयात-निर्यातीचा विचार केल्यास जगातील 75 टक्के व्यवहार या देशांमध्ये होतात. या देशांचे उत्पादन जगाच्या तुलनेत 80 टक्के आहे. ज्याप्रमाणे या देशांचे उत्पादन जगाच्या पाठीवर नोंद घेण्यासारखे आहे, त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनात देखील ही राष्ट्रे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळाचा विचार करता, भारताला महासत्ता होण्यापासून कोणताही देश रोखू शकत नाही. कारण भारताची थक्क करणारी प्रगती. या परिषदेच्या निमित्ताने भारताला जागतिक दक्षिणेचे प्रतिनिधित्व करण्याची आणि आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याची एक नामी संधी उपलब्ध झालेली आहे. कारण देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली आहे. जागतिक पातळीवर इतर देशांच्या अर्थव्यवस्था गडगडत असतांना, निराशाजनक जागतिक आर्थिक व राजकीय स्थितीत भारत हा एका उज्ज्वल केंद्रासारखा चमकत आहे. भारत हा जगाच्या दक्षिणेकडील भागाचे प्रतिनिधित्व करणारा एक प्रमुख आहेच, शिवाय भारताने विशेषतः आफ्रिकेच्या विकासाची गरज जगासमोर ठेवली आहे, हे त्याचे वेगळेपण आहे. भारत एकीकडे विकसित देशांशी घनिष्ठ संबंध ठेवून आहे ,आणि सोबतच विकसनशील देशांचा दृष्टिकोन देखील योग्य प्रकारे समजून घेत आहे, त्याची अभिव्यक्ती करत आहे. याच आधारावर आपण आपली जी-20 अध्यक्षतेची रूपरेखा जागतिक दक्षिण म्हणून ओळखल्या जाणार्‍या ’ग्लोबल साउथ’च्या  देशांच्या सर्व मित्रांसोबत मिळून बनवणार आहोत, जे विकास पथावर गेली अनेक दशके भारताचे सहप्रवासी होते. त्यामुळे भारताचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. भारताने अनेक क्षेत्रात जे यश संपादित केले आहे ते जगातील इतर देशांच्या देखील कामी येऊ शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर भारताने विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ज्याप्रकारे केला आहे, अंतर्भाव करण्यासाठी केला आहे, भ्रष्टाचार संपविण्यासाठी केला आहे, व्यवसाय सुलभीकरण आणि जीवन सुविधा वाढवण्यासाठी केला गेला, हे सर्व विकसनशील देशांसाठी आदर्श आहेत, उदाहरण आहेत.  याच प्रकारे आज भारत महिला सक्षमीकरण, या क्षेत्रात उन्नती करत महिला नेतृत्व विकासात प्रगती करत आहे. आपले जनधन खाते आणि मुद्रा योजना सारख्या योजनांमुळे महिलांचा आर्थिक विकास  अंतर्भाव सुनिश्‍चित झाला आहे. याच प्रकारे विविध क्षेत्रातील आपला अनुभव जगाची मोठी मदत करु शकतो. आणि जी -20 मध्ये भारताची अध्यक्षता या सर्व सफल अभियानांना जगापर्यंत पोहचवण्याचे एक महत्वपूर्ण माध्यम बनून येत आहे.

COMMENTS