Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुणबी दाखल्यासाठी मागासवर्गीय आयोगाचा दौरा

वायंदेशी कुणबी जात समुहाच्या प्रतिनिधींशी करणार चर्चा

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जालन्याती आंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषण सुरू असून, मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले द

धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या
आमदार बंब आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
इंधन दरवाढीमुळे फटाके महागले (Video)

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जालन्याती आंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषण सुरू असून, मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याची मागणी मराठा समाजााने केली आहे. याप्रकरणी राज्यसरकारने समिती नेमली असून, याप्रकरणी मागासवर्गीय आयोग मराठवाड्याचा दौरा करणार आहे. या दौर्‍यात आयोग वायंदेशी कुणबी जात समुहाच्या प्रतिनिधींशी करणार चर्चा करणार आहेत.
 मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. निलीमा सरप (लखाडे) आणि प्रा. डॉ. गोविंद काळे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजासाठी 10 ते 12 सप्टेंबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगर व बीड या जिल्ह्यांतील विविध जातींच्या संदर्भात क्षेत्रपाहणी करिता येत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य रविवारी सायंकाळी 10 सप्टेंबर रोजी खासगी वाहनाने बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम करणार असून, सोमवारी बीडहून माजलगावकडे रवाना. 10.30 वा शासकीय विश्रामगृह माजलगाव येथे आगमन. 11.00 वा. माजलगाव येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी (जायकोची वाडी, धर्मेवाडी). दुपारी 1.00 वा. मालगावहून गेवराई, जि.बीडकडे रवाना. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह, गेवराई, जि.बीड येथे आगमन व भोजन. दुपारी 3.00 ते 4.00 विविध जातसमुहाच्या प्रतिनिधी तसेच संघटनांशी चर्चा व निवेदने स्वीकारणे. 4.00 ते 5.00 वा. गेवराई, जि.बीड येथील वायदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी (पाडळशिंगी, जिरेवाडी). सायंकाळी 06.30 वा. गेवराई, जि.बीड येथून पैठण, जि.छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. 7.30 वा. शासकीय विश्रामगृह पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व मुक्काम. तसेच सकाळी 10.00 ते 10.30 वा. तहसिल कार्यालय, पैठण येथे वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा. 10.30 ते 11.30 वा. पैठण येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी (सोनवाडी, नानेगाव, एकतुनी व भोकरवाडी). 11.30 वा. शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. दुपारी 12.00 वा. शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथे आगमन. 12.00 ते 1.00 वा. विविध जातसमुहांच्या प्रतिनिधी तसेच संघटनांशी चर्चा व निवेदने स्वीकारणे. 1.00 ते 2.00 वा. राखीव. 2.30 ते 3.30 वा. छत्रपती संभाजीनगर मधील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा. 4.00 ते 6.00 वाजेपर्यंत, असा कार्यक्रम मागासवर्गीय आयोगाने आखला आहे.

COMMENTS