Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधी पक्षनेते दानवे आणि पालकमंत्री भुमरेंमध्ये जुंपली  

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगतांना नेहमीच दिसून येत आहे. ठाकर

 शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच- अंबादास दानवे
गोळीबारप्रकरणी आमदार सरवणकरांना अटक करावी – दानवे
“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगतांना नेहमीच दिसून येत आहे. ठाकरे गट असो की शिंदे गट असो, एकमेकांवर टीका करण्याची संधी कुणीच सोडत नसतांना, सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून या दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे दिसून आले.

ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे नेते पालकमंत्री संदीपान भुमरेंमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला. छत्रपती संभाजीनगरमध्य जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री जोरदार बाचाबाची झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना कमी निधी मिळत असल्याची तक्रार करत अंबादास दानवे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षातील नेत्यांना निधी मिळत नसल्याचा आरोप केल्यानंतर पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेही आक्रमक झाले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याने वाद आणखी वाढला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना निधी कमी मिळणे साहजिक आहे अशी प्रतिक्रिया दिली. पूर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे? असेही ते यावेळी म्हणाले.

एकमेकांच्या अंगावर धावून जात केला राडा – पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका कामासंदर्भातील निधीचा मुद्दा उपस्थित केला असताना संदीपान भुमरे यांच्याकडून ठाकरे गटाच्या आमदारांवर अन्याय होतो, निधी वाटपामध्ये भेदभाव केला जातो असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर वाद पेटला. प्रत्येकाला वाटते आम्ही सत्तेमध्ये नसलो तरी आम्हाला निधी जास्त मिळाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो त्याला निश्‍चितच निधी जास्त मिळतो हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली, नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे? असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS