Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पथदिवे घोटाळाप्रकरणी एसआयटी करणार तपास

मुंबई ः सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील पथदिवे वीज देयके प्रकरणात एस आयटी नेमण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत य

बारामती, राहुरीत प्रचाराची सांगता; अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी : सुनेत्रा पवार
बॉम्ब बनवत असल्याची खोटी माहिती देणारा मद्यपी अटकेत
रेल्वे स्टेशनवर पोलिसांची ट्रान्सजेंडर व्यक्तीवर बळाचा वापर करत कारवाई; व्हिडिओ व्हायरल

मुंबई ः सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील पथदिवे वीज देयके प्रकरणात एस आयटी नेमण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत विधान परिषदमध्ये गोपीचंद पडळकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.तसेच आमदार सतेज पाटील यांनीही प्रश्‍न उपस्थित केला होता.यावर उदय सामंत यांनी 15 दिवसात यावर एसआयटी नेमण्याचे आश्‍वासन देण्यात आले. सार्वजनिक वीज देयके दरमाह अकाउंट पेयी धनादेशाने महावितरणने निश्‍चित केलेल्या भरणा केंद्राकडे जमा होत असून, वीज देयके भरणा केंद्राकडे दिलेल्या धनादेशातून महानगरपालिकेचे पूर्ण वीज देयक न भरता खाजगी व्यक्तीची वीज देयके भरल्याची बाब सन 2020 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय याबाबत पडळकर यांनी विचारले असता सामंत यांनी याबाबत घोटाळे झाला असल्याचे मान्य केले.

COMMENTS