Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमीच्या आडनावावरून नवा वाद

पुणे प्रतिनिधी - गौतमी तिच्या नृत्याने नेहमीच चर्चेत असते. अशात तिच्या नावासमोर सबसे कातील गौतमी पाटील हमकास लावलं जातं. गेल्या ४ ते ५ महिन्य

गौतमीच्या कार्यक्रमात साप आल्याने गोंधळ
अश्लीलतेची संस्कृती माजवणाऱ्या गौतमीला फडात नाचायला काय होते ?
सिंधुदुर्ग, कोल्हापुरानंतर तिसऱ्या जिल्ह्यातही गौतमीला नो एन्ट्री!

पुणे प्रतिनिधी – गौतमी तिच्या नृत्याने नेहमीच चर्चेत असते. अशात तिच्या नावासमोर सबसे कातील गौतमी पाटील हमकास लावलं जातं. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून गौतमी आणि तिच्या कार्यक्रमातील राडा यासह वाद यांचं एक वेगळं समिकरणच बनलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांनी राडा करूनये यासाठी आता कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देखील केला जातो. अशात आता सातत्याने वादाच्या विळख्यात असलेली गौतमी पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. गौतमीने आतापर्यंत तिचं खरं आडनाव लपवून ठेवलं असून ती पाटील हे आडनाव लावून फिरत असल्याचा आरोप, मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. काल पुण्यात गौतमीच्या आडनावावरून एक बैठक पार पडली. यावेळी तिचं आडनाव पाटीन नसून चाबुकस्वार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गौतमीचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. त्यामुळे तिने पाटील हे आडनाव वापरू नये. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरुनये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही, असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS