Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकांनी पक्षाचे काम मोठ्या ताकतीने करावे ः आमदार राजळे

शेवगाव तालुका ः भाजप युवा मोर्चा शेवगाव तालुका आयोजित युवासंवाद कार्यक्रम अंतर्गत कॉपी विथ यूथ च्या माध्यमातून तालुक्यातील युवकांशी आमदार मोनिकात

रेशमबाई पिंगळे यांचे निधन
Sangamner : भाजप नेत्याच्या गाड्या रात्रीतून दिल्या पेटवून
तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू

शेवगाव तालुका ः भाजप युवा मोर्चा शेवगाव तालुका आयोजित युवासंवाद कार्यक्रम अंतर्गत कॉपी विथ यूथ च्या माध्यमातून तालुक्यातील युवकांशी आमदार मोनिकाताई राजळे यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे विचार, संकल्पना आत्मसात करून सर्व युवकांना आगामी काळात जनतेप्रति सेवाभाव ठेऊन युवकांनी पक्षाचे कार्य करावे, नव मतदारांना भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरण समजावुन सांगुन येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसीत भारताची निर्मीती होत असून महिला, शेतकरी, मजुर, कामगार आदींचे जीवनमान उंचवण्यासाठी भाजपा काम करत आहे.370 कलम रद्द करून दहशतवादाच्या विळख्यातून  काश्मिरला बाहेर काढत भारताचा अविभाज्य घटक बनवला. किसान सन्मान निधी, जल जीवन मिशनने प्रत्येकाच्या घरात पाणी पोहचवणे, सौभाग्य योजना, उज्वला गॅस असे अनेक महत्वकांक्षी निर्णय मोदी सरकारने घेतले आहे. विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवाराला निवडणुन देण्यासाठी युवकांना प्रयत्न करावे लागतील असे यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.  यावेळी यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश फलके, भाजपा शहराध्यक्ष बापु धनवडे, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, संदिप खरड, महादेव पाटेकर, विनोद शिंदे, सागर सागडे, आंबादास ढाकणे, नारायण मडके, सचिन वाघ, संदिप पातकळ, विष्णु घनवट, बाबा सावळकर, आकाश साबळे, किरण काथवटे, अमोल माने, अमोल घोलप, सोमनाथ मडके, गोकुळ व्यवहारे अनिल सुपेकर, श्रीकांत लबडे, नवनाथ अमृत, सुधीर जायभाये आदी भाजयुमोच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

COMMENTS